पॅरालिम्पिक: आॅस्ट्रेलियाच्या सायकलिस्टवर बंदी

By Admin | Published: September 2, 2016 05:08 PM2016-09-02T17:08:23+5:302016-09-02T17:08:23+5:30

ब्राझीलच्या रिओमध्ये याच महिन्यात सुरू होत असलेल्या पॅरालिम्पिकच्या आधीच आॅस्ट्रेलियाचा सायक्लिस्ट मायकेल गॅलर डोपिंगमध्ये दोषी आढळला आहे.

Paralympic: ban on Australia's cyclists | पॅरालिम्पिक: आॅस्ट्रेलियाच्या सायकलिस्टवर बंदी

पॅरालिम्पिक: आॅस्ट्रेलियाच्या सायकलिस्टवर बंदी

googlenewsNext

मेलबोर्न : ब्राझीलच्या रिओमध्ये याच महिन्यात सुरू होत असलेल्या पॅरालिम्पिकच्या आधीच आॅस्ट्रेलियाचा सायक्लिस्ट मायकेल गॅलर डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने सायक्लिंग आॅस्ट्रेलिया आणि आॅस्ट्रेलियाच्या पॅरालिम्पिक समितीने त्याच्यावर बंदी घातली.
गॅलरला प्रतिबंधित एरथ्रोपायटिन ईपीओ सेवनात दोषी धरण्यात आले. तो रिओ पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. स्कॉटलंडमध्ये जन्मलेल्या गॅलरने बीजिंग आणि लंडन पॅरालिम्पिकचे सुवर्ण जिंकले होते.

जुलैमध्ये इटलीच्या सराव शिबिरात घेण्यात आलेले गॅरलचे नमुने दोषी आढळले आहेत. आॅस्ट्रेलियाच्या डोपिंगविरोधी एजन्सीने या वृत्तास दुजोरा दिला. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने रिओ आॅलिम्पिकसारखेच पाऊल उचलताना पॅरालिम्पिकमध्ये सरकार पुरस्कृत डोपिंगच्या आरोपाखाली रशियाच्या संपूर्ण पथकावर बंदी घातली आहे. त्यानंतर १७५ खेळाडूंच्या पथकाला स्वतंत्रपणे पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होऊ देण्याचे अपील रशियाने क्रीटा लवादाकडे केले होते पण लवादाने देखील अपील फेटाळून लावले.(वृत्तसंस्था)

Web Title: Paralympic: ban on Australia's cyclists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.