कर्मचाऱ्यांना पगारी पितृत्व-मातृत्व रजा
By admin | Published: November 29, 2015 03:04 AM2015-11-29T03:04:23+5:302015-11-29T03:04:23+5:30
सोशल मीडिया कंपनी फेसबुकने मातृत्व आणि पितृत्व रजेचा विस्तार करत आता अमेरिकेच्या बाहेर इतर देशांत कार्यरत पूर्णवेळ कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ देण्याची घोषणा केली आहे.
सॅन फ्रान्सिस्को : सोशल मीडिया कंपनी फेसबुकने मातृत्व आणि पितृत्व रजेचा विस्तार करत आता अमेरिकेच्या बाहेर इतर देशांत कार्यरत पूर्णवेळ कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ देण्याची घोषणा केली आहे.
कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख लॉरी मटलोफ गोलेर यांनी फेसबुकवर ही घोषणा केली. तत्पूर्वी फेसबुकचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी ते दोन महिन्यांची पितृत्व रजा घेणार असल्याचे घोषित केले होते. कंपनी सध्या अमेरिकेत कार्यरत कर्मचाऱ्यांनाच चार महिन्यांची पगारी मातृत्व व पितृत्व रजा देते. मात्र नव्या घोषणेमुळे अमेरिकेबाहेरील कर्मचाऱ्यांनाही या सुविधेचा लाभ मिळेल. (वृत्तसंस्था)
गोलेर म्हणाले की, नव्या धोरणांनुसार, अमेरिका आणि इतर देशांत कार्यरत कंपनीच्या सर्व महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना येत्या एक जानेवारीपासून चार महिन्यांची पगारी पितृत्व व मातृत्व रजा देण्यात येईल. याशिवाय आधीपासूनच सुरू असलेल्या मातृत्व रजेची सुविधाही सुरू राहील. (वृत्तसंस्था)