‘पॅरिस परिषद हे अतिरेक्यांना प्रत्युत्तर’
By admin | Published: November 25, 2015 11:51 PM2015-11-25T23:51:28+5:302015-11-25T23:51:28+5:30
पुढील आठवड्यात पॅरिसमध्ये होणारी हवामान बदलावरील शिखर परिषद दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर असल्याचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे
वॉशिंग्टन : पुढील आठवड्यात पॅरिसमध्ये होणारी हवामान बदलावरील शिखर परिषद दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर असल्याचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. ही परिषद दहशतवाद्यांविरुद्ध लढण्याचा जागतिक संकल्पही दर्शविते, असेही ते म्हणाले.
पॅरिसमध्ये हवामान बदलावरील महत्त्वपूर्ण परिषद होत असून या परिषदेत ओबामांसह अनेक जागतिक नेते सहभागी होणार आहेत. पॅरिसवर इस्लामिक स्टेट अर्थात इसिसने नुकताच हल्ला केला होता. ‘फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्कोईस होलांदे यांच्यासह मी या परिषदेत सहभागी होणार आहे. सगळे देश एकजूट होऊन आपल्या मुलांसाठी चांगले भवितव्य निर्माण करण्यापासून कोणीही आम्हाला परावृत्त करू शकत नाही हे दाखवतील तेव्हा दहशतवाद्यांसाठी तो एक तगडा झटका असेल,’ असे ओबामा म्हणाले. (वृत्तसंस्था)