पॅरिस ऑलिम्पिकची रंगतदार सुरुवात; ४ तासांच्या सोहळ्यात सिंधू-अचंता यांनी केले भारताचे नेतृत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 08:01 AM2024-07-27T08:01:54+5:302024-07-27T08:15:58+5:30
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे भव्य उद्घाटन २६ जुलै रोजी झाले, तर ११ ऑगस्ट रोजी समारोप होणार आहे.
Paris Olympics Opening Ceremony: जगाचे लक्ष लागून राहिलेल्या २०२४ पॅरिस ऑलिम्पिक क्रीडोत्सावाला पॅरिस येथे सुरुवात झाली. नेहमीच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या परंपरेला छेद देत पहिल्यांदाच स्टेडियमऐवजी नदीच्या पात्रात हा उद्घाटन सोहळा पार पडला. सुमारे चार तास पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा चालला. ९५ बोटींतून ६,५०० हून अधिक खेळाडूंनी यामध्ये भाग घेतला. भारताचे ध्वज वाहक पीव्ही सिंधू आणि अंचता शरत कमल होते. उद्घाटन समारंभात भारतीय दलातील ७८ खेळाडू सहभागी झाले होते. परेडमध्ये सहभागी झालेल्या देशांमध्ये भारत ८४ व्या क्रमांकावर होता.
शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमामुळे भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी उद्घाटन सोहळ्यात सहभाग घेतला नाही. ध्वजवाहक सिंधू आणि शरथ कमल व्यतिरिक्त, इतर महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये तिरंदाज दीपिका कुमारी, बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा उद्घाटन समारंभात होते. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या उद्घाटन सोहळ्याने अधिकृतपणे सुरुवात झाली. फ्रान्सची सर्वात प्रसिद्ध ट्रॅक ॲथलीट मेरी-जोस पेरेक आणि तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती ज्युडोका टेडी रिनर यांनी शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकची मशाल संयुक्तपणे प्रज्वलित केली.
ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा मैदानाबाहेर आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ होती. चार तास चाललेल्या या सोहळ्यात अनेक कलाकारांनी भाग घेतला. पॉप स्टार लेडी गागा, अया नाकामुका यांसारखे सुपरस्टार परफॉर्म करताना दिसले. त्याच वेळी, सहा किलोमीटर लांबीच्या परेड ऑफ नेशन्समध्ये २०६ देशांतील ६५०० हून अधिक खेळाडूंनी ९४ बोटींमध्ये भाग घेतला.
पहिल्या दिवसाचे भारताचे वेळापत्रक
बॅडमिंटन
संध्याकाळी ७.१० वाजता - पुरुष एकेरी गट सामना: लक्ष्य सेन विरुद्ध केविन कॉर्डन (ग्वाटेमाला)
रात्री ८ वाजता - पुरुष दुहेरी गट सामना: सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध लुकास कॉर्वे आणि रोनन लाबर (फ्रान्स)
रात्री ११:५० - महिला दुहेरी गट सामना: अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो विरुद्ध किम सो येओंग आणि काँग ही योंग (कोरिया)
बॉक्सिंग
दुपारी १२:०५ - महिला ५४ किलो प्राथमिक फेरीचा सामना: प्रीती पवार विरुद्ध थी किम आन्ह वो (व्हिएतनाम)
हॉकी
रात्री ९ वाजता- पूल ब सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड
नौकानयन
दुपारी १२:३० - पुरुष एकेरी स्कल्स: पनवर बलराज
टेबल टेनिस
७:१५ - पुरुष एकेरी पहिली फेरी: हरमीत देसाई विरुद्ध जैद अबो (येमेन)
टेनिस
०३:३० - पुरुष दुहेरीची पहिली फेरी सामना: रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी विरुद्ध एडवर्ड रॉजर-व्हॅसेलिन आणि फॅबियन रेबोल (फ्रान्स)
शूटिंग
दुपारी १२:३० - १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता: संदीप सिंग / इलावेनिल वालारिवन
दुपारी १२:३० - १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता: अर्जुन बबुता / रमिता जिंदाल
दुपारी २ - १० मीटर एअर पिस्तूल पुरुष पात्रता: अर्जुन सिंग चीमा
दुपारी २ - १० मीटर एअर पिस्तूल पुरुष पात्रता: सरबज्योत सिंग
दुपारी ४ - १० मीटर एअर पिस्तूल महिला पात्रता: मनू भाकर
दुपारी ४ - १० मीटर एअर पिस्तूल महिला पात्रता: रिदम सांगवान