मुस्लीम गृहस्थाची पॅरीसवासियांना जादू की झप्पी

By admin | Published: November 19, 2015 04:25 PM2015-11-19T16:25:00+5:302015-11-19T16:25:00+5:30

मी मुस्लीम आहे, पण दहशतवादी नाही. माझ्यावर विश्वास असेल तर या मला मिठी मारा असे आवाहन एका मुस्लीम गृहस्थाने पॅरीसमध्ये केलं

Parsis for Muslim Families | मुस्लीम गृहस्थाची पॅरीसवासियांना जादू की झप्पी

मुस्लीम गृहस्थाची पॅरीसवासियांना जादू की झप्पी

Next
>ऑनलाइन लोकमत
पॅरीस, दि. १९ - मी मुस्लीम आहे, पण दहशतवादी नाही. माझ्यावर विश्वास असेल तर या मला मिठी मारा असे आवाहन एका मुस्लीम गृहस्थाने पॅरीसमध्ये केलं आणि त्याला मिठी मारत शेकडो पॅरीसवासियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
गेल्या आठवड्यातल्या पॅरीसमधल्या इस्लामिक स्टेटच्या भयानक दहशतवादी हल्ल्यात १३० जण ठार झाले आणि सुमारे २०० जण जखमी झाले. अजून या धक्क्यातून पॅरीस सावरलं नसून एका मुस्लीम गृहस्थाने हा वेगळा मार्ग अनुसरला आहे.
डोळ्यावर पट्टी बांधलेला हा गृहस्थ हातामध्ये दोन फलक घेऊन उभा होता. मी मुस्लीम आहे, आणि मी दहशतवादी आहे असा माझ्यावर आरोप होतोय. माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुमचा माझ्यावर असेल तर या मला मिठी मारा असे त्या फलकावर लिहिले होते.
या माणसाच्या या आवाहनाला पॅरीसवासियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि साश्रू नयनांनी शेकडो लोकांनी त्याला मिठी मारली. डोळ्यावरची पट्टी काढल्यानंतर तो म्हणाला, मी मुस्लीम आहे, परंतु याचा अर्थ मी दहशतवादी आहे असा नाही.मी कधीही कुणाला ठार मारलेलं नाही. गेल्या शुक्रवारी तर माझा वाढदिवस होता, परंतु त्या हल्ल्यानंतर मी वाढदिवस साजरा केला नाही. हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांच्या दु;खात मी सामील असल्याचे उद्गारही त्याने काढले. दहशतवादी हा दहशतवादी असतो. काहीही कारण नसताना तो दुस-याला मारत नाही आमच्या धर्माची हत्या करण्यास मनाई असल्याचंही या गृहस्थानं म्हटलं आहे.

Web Title: Parsis for Muslim Families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.