स्थानिक निवडणुकीत हुजूर पक्षाची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2017 01:43 AM2017-05-06T01:43:24+5:302017-05-06T01:43:24+5:30

इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये सत्तारूढ हुजूर पक्षाने ४0 वर्षांत प्रथमच आघाडी घेतली

The party's lead in the local elections | स्थानिक निवडणुकीत हुजूर पक्षाची आघाडी

स्थानिक निवडणुकीत हुजूर पक्षाची आघाडी

googlenewsNext

लंडन: इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये सत्तारूढ हुजूर पक्षाने ४0 वर्षांत प्रथमच आघाडी घेतली. हुजूर पक्षाने ५00 पेक्षा जास्त जागा जिंकून ११ नगर परिषदांवर सत्ता काबीज केली.
या निवडणुकांमध्ये मजूर पक्षाचा मोठा पराभव झाला असून, हुजूर पक्षाला ३८, मजूर पक्षाला १८ टक्के मते मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. इग्लंडच्या पंतप्रधान थॅरेसा मे यांनी जूनमध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत हुजूर पक्षाच्या विजयासाठी लढत राहाणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, त्यांनी हुजूर पक्षातील कार्यकर्त्यांना सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत हा विजय अंतिम न धरण्याचा सल्ला दिला आहे.

Web Title: The party's lead in the local elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.