परवेझ मुशर्रफ यांची २३ पक्षांची महाआघाडी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:18 PM2017-11-11T23:18:22+5:302017-11-11T23:19:32+5:30

           पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी २३ राजकीय पक्षांची महाआघाडी स्थापन केली आहे. या महाआघाडीचे नाव ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’(पीएआय) असे असणार आहे. याच्या अध्यक्षपदी मुशर्रफ (७४) असतील, तर इकबाल डार यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.    

Parvez Musharraf's 23 Aggravations | परवेझ मुशर्रफ यांची २३ पक्षांची महाआघाडी  

परवेझ मुशर्रफ यांची २३ पक्षांची महाआघाडी  

Next
ठळक मुद्दे ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’च्या स्थापनेने नवी समीकरणे    


इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी २३ राजकीय पक्षांची महाआघाडी स्थापन केली आहे. या महाआघाडीचे नाव ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’(पीएआय) असे असणार आहे. याच्या अध्यक्षपदी मुशर्रफ (७४) असतील, तर इकबाल डार यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  

            
स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, मुशर्रफ यांनी दुबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मीडियाला संबोधित करताना म्हटले की, मुहाजिर समुदायाचे प्रतिनिधित्व करणाºया सर्व पक्षांनी एकजूट होण्याची आवश्यकता आहे. त्यांनी मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) आणि पाक सरजमी पार्टी (पीएसपी) यांना या नव्या राजकीय आघाडीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. या आघाडीच्या स्वरूपाबाबत त्यांनी सांगितले की, सर्व सदस्य पक्ष एकाच नावाने सोबत निवडणुका लढतील.    


मुशर्रफ हे एमक्यूएमचे नेतृत्व करीत असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले. एखाद्या अल्पसंख्यांक पक्षाचे नेतृत्व मी करणे हे हास्यास्पद असल्याचे सांगून ते म्हणाले की, एमक्यूएम-पाकिस्तानचे जे अस्तित्व मूळ स्वरूपात होते ते आता फक्त अर्ध्यावर आले आहे. पक्षाच्या अंतर्गत समस्येबाबत मी चिंतित आहे. जर हा पक्ष एकजूट राहत असेल तर, फारुक सत्तार अथवा मुस्तफा कमाल यांना बदलण्यात मला काही स्वारस्य नाही. एमक्यूएमवर टीका करताना ते म्हणाले की, पक्ष आणि मुहाजिर समुदाय आदर हरवून बसले आहेत.              
पाकिस्तान मुस्लिम लीग-कायदचे नेते चौधरी शुजात आणि चौधरी परवेज इलाही हेही त्यांच्या महाआघाडीत सहभागी होतील, असा विश्वास मुशर्रफ यांनी व्यक्त केला, तर पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांनीही या आघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहन मुशर्रफ यांनी केले. 


मुशर्रफ यांच्यावर गतवर्षी विशेष न्यायालयाने देशद्रोहाचा आरोप लावला होता. यावर्षी आॅगस्टमध्ये बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणात त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. त्यांनी असा दावा केला की, सर्व आरोपांचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत. कारण, न्यायालये नवाज शरीफ यांच्या नियंत्रणात नाहीत. 

 

 

Web Title: Parvez Musharraf's 23 Aggravations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.