रेल्वेगाडी कलती करून प्रवाशाची सुटका

By admin | Published: August 7, 2014 02:31 AM2014-08-07T02:31:40+5:302014-08-07T08:29:42+5:30

मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या संवेदनशून्य प्रशासनाने धडा घ्यावा अशी घटना ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात घडली आहे.

Passage of the train by reducing the train | रेल्वेगाडी कलती करून प्रवाशाची सुटका

रेल्वेगाडी कलती करून प्रवाशाची सुटका

Next
>पर्थ : गाडी पकडताना किंवा गाडीतून उतरताना गाडी आणि फलाट यांच्यामधील फटीमध्ये पडून काही प्रवाशांनी प्राण गमावले व अनेकांचे हात-पाय तुटले तरी स्वत:ची जबाबदारी झटकणा:या मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या संवेदनशून्य प्रशासनाने धडा घ्यावा अशी घटना ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात घडली आहे. 
तेथेही मुंबईतील प्रवाशांप्रमाणोच एकाचा पाय गाडीत चढत असताना गाडी व फलाट यांच्यामधील फटीत अडकला. पण, रेल्वे कंपनीने गाडी तशीच पुढे न दामटता योग्य सूचना देऊन प्रवाशांकडून फलाटावर उभी असलेली गाडी ढकलून थोडी कलती करून घेतली आणि पाय अडकलेल्या त्या प्रवाशाची सुटका केली. पर्थमधील रेल्वेसेवा चालवणा:या ट्रान्सपर्थ कंपनीने अधिकृतपणो पत्रक काढून या अनोख्या घटनेची माहिती दिली असून प्रवासी जनतेने दाखवलेल्या भ्रातृभावाचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे. ऑस्ट्रेलियातील रेल्वेगाडय़ा सुरू होण्यापूर्वी सर्व डब्यांचे दरवाजे आपोआप बंद होणारे असतात व त्यांच्यात असलेल्या ‘पब्लिक अॅड्रेस सिस्टिम’वरून गाडीचा ड्रायव्हर सर्व डब्यांमधील प्रवाशांशी संवाद साधू शकतो. मंगळवारी पर्थ रेल्वे स्टेशनमध्ये गाडीत चढताना निक नावाच्या प्रवाशाचा पाय गाडी व फलाट यांच्यातील चार इंची फटीत अडकून बसला. हे लक्षात येताच ड्रायव्हरने प्रवाशांना डब्यातून खाली उतरायला सांगितले व गाडी कलती करून त्याचा पाय सुखरूप बाहेर काढून घेतला. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Passage of the train by reducing the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.