पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर पाकिस्तानातून फरार
By Admin | Published: February 11, 2016 02:36 PM2016-02-11T14:36:40+5:302016-02-11T14:53:18+5:30
पंजाबच्या पठाणकोट हवाई दलाच्या तळावर जानेवारी महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख मसूद अझह पाकिस्तानमधून फरार झाल्याचे वृत्त आहे.
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ११ - पंजाबच्या पठाणकोट हवाई दलाच्या तळावर जानेवारी महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर हा पाकिस्तानमधून फरार झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मसूद अजहर हा पाकिस्तानमधून फरार झाला असून तो अफगणिस्तानमध्ये पळाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यानंतर अजहरवर कारवाई करण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती.
४७ वर्षीय अजहरला अटक करण्याची मागणी भारताने केली होती. भारताच्या मताशी अमेरिका व ब्रिटनही सहमत होते. त्यानंतर पाकिस्तानवरील दबाव वाढला व त्यांनी काही काळासाठी त्याला ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्याशी मसूदचा संबंध नसल्याचे सांगत त्याला क्लीन चीट दिली.
अखेर आज मसूद अझहर फरार झाल्याचे वृत्त आले.