पठाणकोट हल्ला : नवाज शरीफांचे चौकशीचे आदेश

By admin | Published: January 8, 2016 07:54 PM2016-01-08T19:54:26+5:302016-01-08T19:54:26+5:30

पठाणकोट येथील एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाब शरीफ यांनी भारताने दिलेल्या पुराव्याच्या आधारे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Pathankot attack: Nawaz Sharif's inquiry order | पठाणकोट हल्ला : नवाज शरीफांचे चौकशीचे आदेश

पठाणकोट हल्ला : नवाज शरीफांचे चौकशीचे आदेश

Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ८ -  पठाणकोट येथील एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाब शरीफ यांनी भारताने दिलेल्या पुराव्याच्या आधारे  चौकशी  करण्याचे आदेश दिले आहेत.
द नॅशनल वृत्तपत्राच्या माहितीनुसार,  पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी उच्चस्तरीय बैठक शुक्रवारी बोलविली होती. या बैठकीत भारताने पाकिस्तानकडे दिलेल्या पुरावांच्या आधारे पठाणकोट हल्लाचा तपास करण्यास सहमती दर्शविण्यात आली असून सर्व पुरावे पाकिस्तानच्या गुप्तहेर विभागाचे प्रमुख आफताब सुलतान यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-यांने दिली.   

Web Title: Pathankot attack: Nawaz Sharif's inquiry order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.