ट्रम्प यांना ‘ठार मारणारा’ व्हिडीओ बनविणारी पायल मोदी निलंबित
By admin | Published: January 30, 2017 12:52 AM2017-01-30T00:52:14+5:302017-01-30T00:52:14+5:30
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिमेवर पिचकारीने पाण्याचा फवारा (गोळीबार केल्यासारखा) मारून ‘ते मेले’ असे किंचाळणारा वादग्रस्त व्हिडीओ तयार करणाऱ्या टेक्सास राज्यातील
ह्यूस्टन : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिमेवर पिचकारीने पाण्याचा फवारा (गोळीबार केल्यासारखा) मारून ‘ते मेले’ असे किंचाळणारा वादग्रस्त व्हिडीओ तयार करणाऱ्या टेक्सास राज्यातील डल्लास येथे पायल मोदी या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. ट्रम्प यांचा अध्यक्षपदाचा शपथविधी झाला, त्या दिवशी भारतीय वंशाच्या अमेरिकन शिक्षक पायल मोदी यांनी हा ८ सेकंदांचा व्हिडीओ स्वत:च्या वैयक्तिक इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. तो व्हायरल झाला होता. मोदी या अॅडमसन हायस्कूलमध्ये कला शिक्षक आहेत.
ट्रम्प हे शपथविधीनंतर बाहेर येत आहेत व त्यांच्यावर पायल मोदी पाण्याच्या पिचकारीने फवारा मारत आहेत, असे चित्र वर्गात पांढऱ्या फळ््यावर काढले होते याचे चित्रण व्हिडीओ कॅमेऱ्याने केले होते.