पीसीबी-बीसीसीआय प्रमुखांमध्ये चर्चा

By admin | Published: July 4, 2016 05:43 AM2016-07-04T05:43:25+5:302016-07-04T05:43:25+5:30

शहरयार खान आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यादरम्यान आयसीसीच्या वार्षिक संमेलनामध्ये महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा झाली.

PCB-BCCI discussions in chief | पीसीबी-बीसीसीआय प्रमुखांमध्ये चर्चा

पीसीबी-बीसीसीआय प्रमुखांमध्ये चर्चा

Next


कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यादरम्यान आयसीसीच्या वार्षिक संमेलनामध्ये महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यात पुन्हा द्विपक्षीय क्रिकेट संबंध
सुरू करण्यासाठी तटस्थ स्थळावर मालिका आयोजित करण्याच्या शक्यतेबाबतच्या मुद्याचा समावेश आहे.
पीसीबीच्या नजिकच्या सूत्रांनी सांगितले, की शहरयार यांनी गेल्या आठवड्यात एडिनबर्गमध्ये आयसीसीच्या बैठकीदरम्यान ठाकूर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा केली. दोन्ही बोर्डांनी तटस्थस्थळी द्विपक्षीय मालिका आयोजित करण्यासाठी योग्य कॅलेंडर तयार करण्याचा प्रयत्न करावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. उभय देशांदरम्यान दोन वर्षांत एकदा द्विपक्षीय मालिकेचे आयोजन व्हायला हवे.
सूत्राने पुढे सांगितले, की पीसीबी प्रमुखांनी म्हटले, की पाकिस्तान भारतात खेळण्यास इच्छुक असल्यामुळे बीसीसीआयने मालिकेचे यजमानपद भूषवायला हवे. पाकिस्तानला ज्या वेळी यजमानपद भूषवायचे असेल त्या वेळी उभय देशांच्या बोर्डांच्या सहमतीने तटस्थस्थळाची निवड करण्याचा निर्णय घेता येईल.
२०१६ च्या शेवटी किंवा
२०१७ मध्ये उभय देशांदरम्यान पूर्ण द्विपक्षीय मालिकेच्या आयोजनासाठी आपल्या देशाच्या सरकारची
परवानगी घेण्यासाठी दोन्ही
देशांच्या बोर्डांच्या प्रमुखांनी सहमती दर्शवली. (वृत्तसंस्था)

Web Title: PCB-BCCI discussions in chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.