केंद्राचा नागा संघटनेसोबत शांतता करार पपपप
By admin | Published: August 3, 2015 10:26 PM2015-08-03T22:26:54+5:302015-08-03T22:26:54+5:30
नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचार रोखत शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकताना केंद्र सरकारने सोमवारी नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन-इसाक मुईवा) या नागा अतिरेकी संघटनेसोबत ऐतिहासिक शांती करारावर स्वाक्षरी केली. ही महात्मा गांधींना वाहिलेली उचित श्रद्धांजली, अशा शब्दांत वर्णन केल्या गेलेल्या या करारामुळे ईशान्येतील चीनच्या लुडबुडीलाही आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.
Next
न ी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचार रोखत शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकताना केंद्र सरकारने सोमवारी नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन-इसाक मुईवा) या नागा अतिरेकी संघटनेसोबत ऐतिहासिक शांती करारावर स्वाक्षरी केली. ही महात्मा गांधींना वाहिलेली उचित श्रद्धांजली, अशा शब्दांत वर्णन केल्या गेलेल्या या करारामुळे ईशान्येतील चीनच्या लुडबुडीलाही आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. नागा संघटनेशी पहिल्यांदा १९९७ मध्ये शस्त्रसंधी झाल्यापासून चर्चेच्या ८० पेक्षा जास्त फेर्या पार पडल्यानंतर हा करार प्रत्यक्षात येऊ शकला. मुईवा गट शांतता प्रक्रियेत पुढचे पाऊल टाकत असताना खपलांग गट मात्र थेट लष्करी जवानांवर प्राणघातक हल्ले करण्यात गुंतल्याच्या पार्श्वभूमीवर हा करार झाला आहे. परिणामी हिंसक बंडखोरांबाबत वेगळी नीति अवलंबणे सुरक्षा यंत्रणांना सोपे जाणार आहे.