पाकिस्तानच्या १३ टीव्ही वाहिन्यांना दंड

By admin | Published: August 29, 2016 02:27 AM2016-08-29T02:27:09+5:302016-08-29T02:27:09+5:30

माजी क्रिकेटपटू व वरिष्ठ राजकीय नेते इमरान खान यांनी तिसरे लग्न केल्याची खोटी बातमी दिल्याबद्दल पाकिस्तानातील १३ दूरचित्रवाणी वाहिन्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Penalties for 13 Pakistani TV channels | पाकिस्तानच्या १३ टीव्ही वाहिन्यांना दंड

पाकिस्तानच्या १३ टीव्ही वाहिन्यांना दंड

Next

इस्लामाबाद : माजी क्रिकेटपटू व वरिष्ठ राजकीय नेते इमरान खान यांनी तिसरे लग्न केल्याची खोटी बातमी दिल्याबद्दल पाकिस्तानातील १३ दूरचित्रवाणी वाहिन्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
इमरान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ’ने (पीटीआय) यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीवरील सुनावणीनंतर पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिआ रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटीने (पीईएमआरए) हा दंड
ठोठावला. तथापि, पीटीआयने आपली तक्रार मागे घेतली असली तरी पेमराने चुकीची बातमी ही वाहिन्यांच्या मालकांना ज्या हेतूने परवाना दिला गेला आहे त्याविरुद्ध असल्यामुळे दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला.
पत्रकारितेचा दर्जा कायम राखण्यासाठी या वाहिन्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)

Web Title: Penalties for 13 Pakistani TV channels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.