विमानात योगा करणा-या प्रवाशाला ४३,६०० डॉलर्सचा दंड

By admin | Published: April 26, 2016 12:13 PM2016-04-26T12:13:06+5:302016-04-26T12:33:21+5:30

विमानात योगासने करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मागच्या महिन्यात अटक करण्यात आलेल्या एका प्रवाशांची अमेरिकन न्यायालयाने सुटका केली आहे.

Penalty for $ 43,600 for a passenger carrying plane | विमानात योगा करणा-या प्रवाशाला ४३,६०० डॉलर्सचा दंड

विमानात योगा करणा-या प्रवाशाला ४३,६०० डॉलर्सचा दंड

Next

ऑनलाइन लोकमत 

हवाई, दि. २६ - विमानात योगासने करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मागच्या महिन्यात अटक करण्यात आलेल्या एका प्रवाशांची अमेरिकन न्यायालयाने सुटका केली आहे. हयॉंगटाई पाई असे या आरोपीचे नाव असून, त्याला आपल्या मायदेशात दक्षिण कोरियामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पाईला अमेरिकन हवाई कंपनीला ४३,६०० डॉलर्सची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. . 
 
पाई आणि त्याची पत्नी लग्नाचा ४० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी हवाई येथे आले होते. हवाईवरुन ते विमानाने मायदेशी परतत असताना पाईला अटक करण्यात आली. होनोलुलु ते टोक्यो प्रवासा दरम्यान पाईला त्याच्या आसनावर बसायचे नव्हते. तो योगा करण्यासाठी विमानाच्या मागे गेला. त्यावेळी विमानातील क्रू ने त्याला त्याच्या जागेवर जाऊन बसण्याची विनंती केली. पण पाई आपल्या जागेवर परतण्यास तयार नव्हता. 
 
त्याने क्रू मेंबर्स आणि अन्य प्रवाशांना धमकावले. विमानातील या गोंधळामुळे वैमानिकाने  विमान पुन्हा होनालुलुच्या विमानतळावर वळवले. तेथे त्याला तपास अधिका-यांनी अटक केली. अमेरिकन न्यायालयाचे न्यायाधीश केवीन चांग यांनी त्याची बॉण्डवर सुटका केली पण त्याला हवाई सोडून जाण्यास मनाई केली होती. 
 
मागच्या आठवडयात विमानात कर्मचा-याशी वाद घातल्या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. पाईच्या वकिलांनी तो शिक्षा भोगण्यासाठी परत येईल याचे आश्वासन दिल्यानंतर त्याला मायदेशात परतण्याची परवानगी देण्यात आली. होनालुलु सोडण्यापूर्वी पाईला १२५० डॉलर्स भरावे लागणार असून, तो शिक्षा भोगण्यासाठी जुलैमध्ये परत येणार आहे. 
 

Web Title: Penalty for $ 43,600 for a passenger carrying plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.