सफाई कामगार, शिपाई आणि डोमेस्टिक हेल्परची नोकरी; दरमहा 8 लाख रुपयांपर्यंत मिळेल पगार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 06:34 PM2022-07-29T18:34:40+5:302022-07-29T18:43:15+5:30
JOBS IN AUSTRALIA : मेलबर्न, सिडनी, पर्थ, कॅनबेरा, न्यू कॅसल येथील अनेक कंपन्या सफाई कामगार, डोमेस्टिक हेल्पर आणि सफाई कामगार यासारख्या नोकऱ्या परदेशी लोकांना ऑफर करत आहेत.
सफाई कामगार, शिपाई आणि घरगुती नोकर म्हणून कामे करणाऱ्या लोकांना भारतात खूपच कमी पगार मिळतो. मात्र सध्या ऑस्ट्रेलियात या कामांसाठी कोट्यवधी रुपये मिळत आहेत. मेलबर्न, सिडनी, पर्थ, कॅनबेरा, न्यू कॅसल येथील अनेक कंपन्या सफाई कामगार, डोमेस्टिक हेल्पर आणि सफाई कामगार यासारख्या नोकऱ्या परदेशी लोकांना ऑफर करत आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाला सध्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, कंपन्या एका सफाई कामगाराला भारतीय डॉक्टर आणि इंजिनिअरपेक्षा कितीतरी पटीने जास्त पगार द्यायला तयार आहेत. कंपन्यांनी दर तासाला पगार वाढवला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे सॅलरी पॅकेज एक कोटींपर्यंत पोहोचले आहे. यानंतरही ऑस्ट्रेलियात सफाई कामगार मिळत नाहीत.
कंपन्यांचे सरासरी सॅलरी पॅकेज 72,00,000 रुपयांपासून 80,00,000 रुपयांपर्यंत आहे. अनेक कंपन्यांनी यामध्ये वाढ करुन 98,00,000 रुपयांपर्यंत करण्यास तयार झाल्या आहेत. डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार, सिडनीस्थित क्लिनिंग कंपनी अॅब्सोल्युट डोमेस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक जो वेस म्हणाले की, कर्मचाऱ्यांचे पगार वाढवावे लागतील. कारण सफाई कामगार नाहीत. आता स्वच्छता विभागाचा पगार प्रति तास 45 डॉलर (भारतीय चलनात 3600 रुपये) करण्यात आला आहे.
तसेच, ऑस्ट्रेलियाला 2021 पासून सफाई कामगाराची कमतरता भासत आहे. जवळपास वर्षभरापूर्वी येथे सफाई कामगाराला तासाला 2700 रुपये मिळत होते, असेही जो वेस यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियामध्ये इतर कंपन्यांची परिस्थिती कमी-अधिक सारखीच आहे. काही सफाई कंपन्या तासाला 4700 रुपये किंवा त्याहूनही अधिक रक्कम देण्यास तयार आहेत. याचबरोबर, खिडक्या आणि गटर साफ करण्यासाठी वर्षाला 82 लाख रुपयांपर्यंतची ऑफर दिली जात आहे.