या देशात सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याऐवजी सायकलने नागरिक करतायेत प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:12 PM2020-05-22T12:12:06+5:302020-05-22T12:12:46+5:30
सायकलची मागणी इतकी वाढली आहे की ग्राहकांना खरेदीकेल्यानंतर काही दिवस वाट बघावी लागत आहे.
अमेरिका कोरोनामुळे जगात सर्वाधिक प्रभावित देश आहे. येथे १५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आणि ९० हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक परिणाम न्यूयॉर्कवर झाला आहे. येथे साडेतीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आणि २८ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, येथील नागरिकांना कोरोनाने धडकी भरवली असताना विविध पर्याय वापरत स्वतःचे संरक्षण करताना दिसतायेत. घराबाहेर पडणा-यांनी पब्लिक ट्रान्सपोर्टकडेदेखील पाठ फिरवली आहे. यासाठी अमेरिकेतील नागरिक सायकला जास्त वापर करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सायकलची अमेरिकेत मागणीही वाढली आहे. सायकलची मागणी इतकी वाढली आहे की ग्राहकांना खरेदीकेल्यानंतर काही दिवस वाट बघावी लागत आहे. मागणी जास्त वाढल्याने सायकलचा पुरवठा कमी पडत आहे. नागरिक स्वतःच्या संरक्षणाची कसलीही कमी ठेवत नाही. त्यामुळे केवळ गजेपुरतेच घराच्या बाहेर पडत आहे.
तसेच गर्दी होणार नाही याकडेही विशेष काळजी घेतली जात आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन आणि फ्रान्समध्ये देखील सायकलची विक्री वाढली आहे. तसेच भारताप्रमाणे अमिरेकतील बहुतांशी नागरिक आपले शहर सोडत दुस-या ठिकाणी स्थायिक होत आहे. अनेक श्रीमंत नागरिकांनी लोकांच्या गर्दी न राहात लांब एकांतात राहण्यास पसंती देत आहेत. 1 मार्च ते 1 मेपर्यंत न्यूयॉर्क शहरातील 5% पेक्षा जास्त लोक शहर सोडून गेले आहेत. त्यामुळे केवळ भारतातच नागरिकांचे स्थलांतराचे प्रमाण आहे असे नसून अमेरिकेसारख्या बलाढ्य देशावर कोरोनामुळे हतबल झाल्याचे चित्र आहे.
अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत. कोरोनामुळे दोन महिन्यांत सुमारे १.७ कोटी लोकांसमोर खाद्यान्न संकट उभे ठाकले आहे. दोन महिन्यांत ही संख्या सुमारे ४६% वाढली आहे. अमेरिकेत कोरोना आणि इतर कारणांनी उपाशी राहणाऱ्या लोकांची संख्या साडेपाच कोटीच्यावर झाली आहे.