आयुष्य 'बर्बाद' करतायत 9-5 जॉब करणारे लोक, वयाच्या 23व्या वर्षीच कोडपती बनलेल्या तरुणानं सांगितली ट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 08:52 AM2023-06-02T08:52:54+5:302023-06-02T08:54:47+5:30
कॅम आता दरमहिन्याला 2 कोटींहून अधिकची कमाई करत आहे...
आपली हिंमत आणि मेहनतीच्या जोरावर वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षीच कोट्यधीश बनलेल्या एका तरुणाने, जे लोक 9 ते 5 नोकऱ्या करत आहेत, ते आपले आयुष्य वाया घालवत आहेत, असा दावा केला आहे. कॅम मोअर असे या तरुणाचे नाव आहे. त्याने नोकरी सोडली आणि तो आता इतरांनाही नोकरी नोकरी सोडण्याचा सल्ला देत आहे. कॅम अत्यंत उत्कृष्ट जीवन जगत आहे. त्याने ई-कॉमर्स व्यवसाय सुरू केला असून तो वेगाने वाढत आहे.
द सनने दिलेल्या वृत्तानुसार, कॅम दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये राहतो. तो जीवनाचा भरपूर आनंद घेत आहे. असे जीवन कुणीही मिळवू शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. कॅमने कारपेंटरचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली, मात्र प्रशिक्षण संपण्याच्या सहा महिने आधीच त्याने हे काम सोडले. तसेच, थोड्या पैशांसाठी आठवड्यातील पाच दिवस 12-12 तास, काम करून आपण त्रस्त झालो होतो, असेही तो सांगतो.
बिझनेसमधून कोट्यवधी कमावतो कॅम -
कॅमने 2020 मध्ये आपले करिअर सोडले आणि तो ई-कॉमर्स उद्योगात उतरला. या उद्योगात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. खरे तर असे करून त्याने मोठा धोकाच पत्करला होता. मात्र, तो आता दरमहिन्याला 2 कोटींहून अधिकची कमाई करत आहे. डेली मेल सोबत बोलताना त्याने सांगितले की, जेव्हा पैसे येऊ लागले तेव्हा मी अवाक झालो. तो म्हणाला, 'खरोखरच यात धोका होता. कारण मी स्वतःच्या बळावर सर्वकाही केले आहे आणि मला वाटते की, याच गोष्टीची लोकांना सर्वाधिक भीती वाटते. तसेच, असे लोक कसलाही विचार न करता, आपले आयुष्य बर्बात करत आहेत', असे मला वाटते, असेही त्याने म्हटले आहे.
कॅम म्हणाला, 'लोकांना सांगितले जाते की, आपल्याला आयुष्यात केवळ शाळेत जायचे आहे, मग पदवी घ्यायची आहे अथवा व्यवसाय करायचा आहे, घर घ्यायचे आहे आणि आयुष्यभर त्याचे पैसे चुकवायचे आहे. मीही काही काळ याच मानसिकतेत होतो. मात्र आपण स्वतःसाठी काम करून किती पैसे कमावू शकतो याची जाणीव मला झाली आणि मग मी मागे वळून पाहिले नाही.' आता कॅम आली कंपनी सिक्स फिगर ड्रॉप शिपरद्वारे ई-कॉमर्स उद्योगाविषयी लोकांना माहिती देत आहे. 2020 मध्ये त्याचा ब्रँड लॉन्च झाला, तेव्हापासून त्याने 2500 हून अधिक लोकांना प्रशिक्षण दिले आहे.
कोट्यधीश झाल्यानंतर, कॅम 6.46 कोटी रुपयांच्या घरात राहतो. त्याने BMW M5 कारही घेतली आहे. याशिवाय तो आयुष्याचा आनंदही घेत आहे. तो म्हणाला की, कारपेंटर कामात त्याला आनंद मिळत होता. मात्र थोड्या दिवसांतच ही नोकरीही आपल्याला कुचकामी वाटू लागली. 'आता प्रत्येक दिवस खरोखरच वेगळा आहे आणि मी माझ्या नशिबाचा मास्टर आहे,' असेही तो सांगतो.