मृत्यूच्या देवतेची पूजा करणारे लोक मेक्सिकोत

By admin | Published: June 19, 2017 01:15 AM2017-06-19T01:15:33+5:302017-06-19T01:15:33+5:30

हिंदू विचारांनुसारही मृत्युला पवित्र मानले गेले असले तरी मृत्युच्या देवतेची पूजा करणे हे काही शुभ मानले जात नाही. पण अमेरिकेच्या दक्षिण पश्चिमेकडील मेक्सिकोमध्ये एक समाज असा आहे

People worshiping the god of death Mexicote | मृत्यूच्या देवतेची पूजा करणारे लोक मेक्सिकोत

मृत्यूच्या देवतेची पूजा करणारे लोक मेक्सिकोत

Next

हिंदू विचारांनुसारही मृत्युला पवित्र मानले गेले असले तरी मृत्युच्या देवतेची पूजा करणे हे काही शुभ मानले जात नाही. पण अमेरिकेच्या दक्षिण पश्चिमेकडील मेक्सिकोमध्ये एक समाज असा आहे की तो मृत्युच्या देवतेची पूजा करतो. मृत्युला पवित्र मानणाऱ्या या समाजाच्या लोकांची ही देवी एक संत महिला आहे. तिच्या आदर्शानुसार त्यांचे जीवन चालते. ते असे समजतात की ही देवी आपल्या भक्तांना आजारपणातून वाचवते व संरक्षण देते. मृत्युच्या नंतर सुरक्षित मार्गावर जायला ती मदत करते. संता मुर्ते म्हणजे पवित्र मृत्युला आराधनेचा विषय मानणारे हे लोक आपल्या प्रार्थनास्थळी व्यक्तिचा सांगाडा सजवून त्याचे पूजन करतात. ही परंपरा खूप जुनी आहे व लोक खूप आधीपासून मृत्युच्या देवीचे पूजन करतात. कॅथॉलिक संप्रदायाचा उगम झाल्यानंतर या परंपरेचे पालन लपूनछपून होत होते आता मात्र बऱ्याच वर्षांपासून ते उघडपणे होत आहे.जे लोक या परंपरेला योग्य मानत नाहीत त्यांचे म्हणणे असे की हा सगळा प्रकार गुन्हेगारांनी पसरवलेले जाळे आहे. ही बाब काही प्रमाणात योग्यही मानली जाऊ लागली आहे. मेक्सिकोच्या गुन्हेगारीचे प्रमाण मोठे असलेल्या तेपितो या भागात साधारणत: १५ वर्षांपूर्वी एका महिलेने संता मुर्ते प्रार्थनास्थळ स्थापन केले. तिच्या पाठिराख्यांचे म्हणणे हे सगळे आरोप खोटे आहेत. ही प्राचीन परंपरा असून ती आस्था आणि विश्वासाशी तिचा संबंध आहे, असेही पाठिराखे म्हणतात. युरोपमध्ये कॅथॉलिक संप्रदायदेखील अशा पूजेला चुकीचे मानतो व त्याला मान्यता देत नाही. स्वत: पोप फ्रान्सिस यांनी गेल्या वर्षी आपल्या मेक्सिको दौऱ्यात अशा प्रकारच्या गूढ शक्तींवर विश्वास असणाऱ्यांवर टीका केली होती.

Web Title: People worshiping the god of death Mexicote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.