सोन्याच्या खाणीत भीषण स्फोट, आगीत २७ जणांचा मृत्यू; नातेवाईकांचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 10:27 AM2023-05-08T10:27:59+5:302023-05-08T10:30:48+5:30
या खाणीची खोली १०० मीटर खोल असून आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचं सांगण्यात येत आहे
दक्षिणी पेरुच्या (Peru) एका परिसरात असलेल्या सोन्याच्या खाणीत रविवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत २७ मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पेरुच्या इतिहासातील आत्तापर्यंतच सर्वात वेदनादायी घटना असल्याचं तेथील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी खाणीत धाव घेतली. यावेळी, आप्तजनांचे मृतेदह पाहून अनेकांनी हंबरडा फोडला. रोया मार्सेलिना एगुइरे नामक महिलाचे ५१ वर्षीय पति फेडेरिको इडमे ममानी यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
या खाणीची खोली १०० मीटर खोल असून आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचं सांगण्यात येत आहे. पब्लिक प्रॉसिक्यूटर गियोवन्नी माटोस यांनी एका न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले की, येथील खाणीत २७ लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. राजधानी अरेक्विपा शहरापासून १० तास दूर असलेल्या कोंडेसुयोस प्रांत मधील खाणीत स्फोट झाल्यानंतर ही भाषण आग भडकली होती. खाणीतील लाकडाच्या खांबाने सर्वात आधी पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच आपत्ती बचवा दलाने खाणीत येऊन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
दरम्यान, दम घोटल्याने आणि आगीत जळाल्याने खाणीतील कामगारांचा मृत्यू झाला. यापूर्वीही २०२२ मध्ये खाणीशी संबंधित एका दुर्घटनेत ३९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, आता पुन्हा एकदा अशीच धक्कादायक घटना घडली आहे.