बलात्काऱ्यांना या देशात बनवलं जाणार नपुंसक, केमिकलचा केला जाणार वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 01:03 PM2022-04-19T13:03:49+5:302022-04-19T13:04:40+5:30
Peru Chemical Castration : कॅस्टिलो यांनी एका ३ वर्षाच्या मुलीच्या केसचा उल्लेख केला. ज्यामुळे देशात मोठा आक्रोश निर्माण झाला होता.
Peru Chemical Castration: बलात्काऱ्यांना वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जातात. इतकंच काय तर काही देशात मृत्यूदंडही दिला जातो. अशात आता पेरू देशात एक असं विधेयक तयार केलं जात आहे, ज्याबाबत वाचून गुन्हेगारांना धडकी भरेल. या कायद्यानुसार बलात्कार करणाऱ्या लोकांना नपुंसक केलं जाईल. पेरूचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांनी ही घोषणा केली.
कॅस्टिलो यांनी एका ३ वर्षाच्या मुलीच्या केसचा उल्लेख केला. ज्यामुळे देशात मोठा आक्रोश निर्माण झाला होता. बलात्काऱ्यांना नपुसंक बनवण्यासाठी केमिकल औषधांचा वापर केला जाईल. पेरू हा पहिला देश नाहीये जिथे अशाप्रकारची शिक्षा सुरू होत आहे. पेरूआधी अशाप्रकारच्या शिक्षेचं प्रावधान दक्षिण कोरिया, पोलॅंड, चेक गणराज्य आणि संयुक्त राज्य अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये लागू आहे.
कॅस्टिलो म्हणाले की, येणाऱ्या काही दिवसात हा प्रस्तावर औपचारिकपणे दिला जाईल आणि ते कॉंग्रेसच्या समर्थनाची वाट बघत आहेत. ज्यानंतर हे विधेयक पास करण्यासाठी पाठवलं जाईल. कायदेमंत्री फेलिक्स चेरो म्हणाले की शिक्षा आणि मानसिक आरोग्यात उपाय म्हणून केमिकल कॅस्ट्रेशन प्रस्तावित केलं जाईल.
कारो म्हणाले की, सध्या पेरूमध्ये बलात्काऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. तरीही ३५ वर्ष तुरूंगात राहिल्यानंतर कैद्याच्या शिक्षेची समीक्षा केली जाऊ शकते. पेरू लिब्रेच्या कॉंग्रेस महिला आणि कॉंग्रेस महिला आयोगाच्या अध्यक्षा एलिजाबेथ मदीना यांनी प्रस्तावाला समर्थन दिलंय.