पेशावर हत्याकांडाचा सूत्रधार ठार

By admin | Published: December 27, 2014 04:51 AM2014-12-27T04:51:38+5:302014-12-27T04:51:38+5:30

पेशावरमधील लष्करी शाळेत हत्याकांड घडवून १५० लोकांचा जीव घेणारा सूत्रधार सुरक्षा दलाच्या कारवाईत ठार झाला आहे.

Peshawar massacre killer killed | पेशावर हत्याकांडाचा सूत्रधार ठार

पेशावर हत्याकांडाचा सूत्रधार ठार

Next

पेशावर : पेशावरमधील लष्करी शाळेत हत्याकांड घडवून १५० लोकांचा जीव घेणारा सूत्रधार सुरक्षा दलाच्या कारवाईत ठार झाला आहे. सद्दाम असे त्याचे नाव असून, तो तेहरिक-ए-तालिबान या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. जामरुद जिल्ह्यातील गुंडी सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत तो ठार झाला आहे. त्याच्या एका साथीदाराला जिवंत पकडण्यात आले आहे, असे खैबर एजन्सी पोलिटिकल एजंट शहाब अली याने सांगितले.
सद्दाम हा तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान संघटनेतील तारिक गेडार गटाचा सदस्य आहे. त्याने पेशावरमधील शाळेवर हल्ला करणाऱ्या सात हल्लेखोरांना प्रशिक्षण दिले होते. १६ डिसेंबर रोजी पेशावर येथे झालेल्या या हल्ल्यात १५० लोक ठार झाले असून, त्यातील बहुतांश शाळकरी मुले आहेत. गेल्या वर्षी खैबर पख्तुनवा प्रांतात ११ सैनिक व ८ स्काऊटस्च्या हत्याकांडाचाही सद्दाम हाच सूत्रधार होता.
७ हजार संशयितांना अटक करणार
बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाकिस्तानात ७ हजार जणांना अटक करण्यात येणार आहे. पाकिस्तानी गृहमंत्रालयाने चारही प्रांतांना आदेश दिले असून ६,७७७ संशयितांना अटक करावी असे म्हटले आहे. यातील बहुतांश संशयित खैबर पख्तुनवा प्रांतातील आहेत. दरम्यान, अमेरिकी ड्रोन हल्ल्यात वजिरीस्तान भागातील सात दहशतवादी ठार झाले असून, त्यातील तीन उझबेक आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Peshawar massacre killer killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.