शिकार करायला गेला होता तरूण, पाळीव श्वानाने 'झाडली' बंदुकीची गोळी; झाला त्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 09:36 AM2022-11-30T09:36:04+5:302022-11-30T09:38:21+5:30
ही घटना तुर्कीमधील आहे. मिररच्या एका रिपोर्टनुसार, 32 वर्षीय या तरूणाचं नाव ओजगुर गेवरेकोग्लू होतं. तो नुकताच तुर्कीतील सॅमसन प्रांतात शिकार करण्यासाठी गेला होता.
Pet Dog Press The Trigger: काही लोकांना श्वास खूपच आवडतात. श्वास सगळ्यात इमानदार प्राणी मानला जातो. श्वानांनी आपल्या मालकांचा जीव वाचवण्याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. पण एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून हैराण व्हाल. या घटनेत एका तरूणाचा गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला आणि बंदुकीची गोळी त्याला त्याच्या पाळीव श्वानामुळे लागली.
ही घटना तुर्कीमधील आहे. मिररच्या एका रिपोर्टनुसार, 32 वर्षीय या तरूणाचं नाव ओजगुर गेवरेकोग्लू होतं. तो नुकताच तुर्कीतील सॅमसन प्रांतात शिकार करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा श्वानही त्याच्यासोबत होता. त्याचा श्वास सगळीकडे त्याच्या सोबत होता. दोघांचे सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत.
त्या दिवशी ते शिकारीसाठी निघाले होते. पण तेव्हाच अचानक त्याचा मृत्यू झाला. तरूणाच्या मृत्यूची बातमी मिळताच त्याचे कुटुंबिय हैराण झाले. असं सांगितलं जात आहे की, जी बंदुक त्याच्याजवळ होती ती लोड होती आणि बंदुकीच्या ट्रिगरवर श्वानाचा पाय पडला. त्यामुळे त्यातून गोळी झाडली गेली. दुर्दैवाने ही गोळी तरूणालाच लागली.
तरूणाचा मृत्यू झाला. कारण श्वान लोड केलेल्या एका शॉटगनवर गेला होता. रिपोर्टनुसार, या मृत्यूच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कारण शिकारीवर तरूणासोबत त्याचे काही मित्रही होते.