पाळीव कुत्र्याने आधी मालकाला मारले, नंतर नातेवाईकालाही आपले दोन्ही पाय गमवावे लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 09:37 AM2021-11-23T09:37:44+5:302021-11-23T09:37:50+5:30
मालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मेहुण्याने कुत्र्याला आपल्या सोबत नेले होते, मात्र हॅरिसच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच कुत्र्याने त्याच्या मेव्हण्या मार्क डेलाही आपला बळी बनवले.
लंडन :कुत्रा हा माणसांचा सर्वात निष्ठावान प्राणी मानला जातो, जो घराचे नेहमी रक्षण करतो. पण ब्रिटनमधून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक पाळीव कुत्र्या त्याच्या मालकाच्या मृत्यूचे कारण बनला आणि त्यानंतर मालकाच्या नातेवाईकालाही कुत्रा चावल्यामुळे दोन्ही पाय गमवावे लागले.
मालकावर प्राणघातक हल्ला
'द सन'च्या बातमीनुसार, कुत्र्याने चावा घेतल्याने त्याचा मालक बॅरी हॅरिसचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांच्या शरीरात संसर्गही पसरला होता. हॅरिसने हा कुत्रा मृत्यूपूर्वी दीड लाख रुपयांना विकत घेतला होता.
पाय कापावे लागले
मालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मेहुण्याने या कुत्र्याला त्याच्यासोबत नेले. पण, हॅरिसच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच त्या कुत्र्याने त्याच्या मेव्हण्या मार्क डेलावर हल्ला केला. हल्ल्यानंतर मार्कच्या शरीरात संसर्ग इतका वाढला होता की, डॉक्टरांना ऑपरेशन करुन त्याचे दोन्ही पाय आणि डाव्या हाताची बोटेही कापावी लागली.
दुसरा मालकही अडचणीत आला
कुत्रा चावल्यानंतर मार्कची प्रकृती खूपच वाईट झाली होती. डॉक्टरांनी सांगितले की कुत्रा त्याच्या दुखापतीसाठी 100% जबाबदार आहे. उपचारादरम्यान, मार्कचे संपूर्ण शरीर थंड झाले होते आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी, त्याच्या अवयवांनी काम करणे थांबवल्यामुळे त्याला जबरदस्तीने 10 दिवस कोमात ठेवावे लागले. शेवटी, शस्त्रक्रिया करून त्याचे दोन्ही पाय आणि बोटे कापावी लागली. हॉस्पिटलमध्ये 82 दिवस घालवून मार्क घरी परतला असून त्याला प्रोस्थेटिक पायांच्या मदतीने पुढे चालता येईल अशी आशा आहे.