येत्या ८ वर्षात नष्ट होतील पेट्रोल कार

By admin | Published: May 18, 2017 02:42 PM2017-05-18T14:42:14+5:302017-05-18T15:08:46+5:30

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या अर्थतज्ज्ञांचा अभ्यास, चारचाकी गाड्यांचं भवितव्य धोक्यात

Petrol cars will be destroyed in the next 8 years | येत्या ८ वर्षात नष्ट होतील पेट्रोल कार

येत्या ८ वर्षात नष्ट होतील पेट्रोल कार

Next

- निशांत महाजन

आठ वर्षानंतर जगाच्या पाठीवर कुठंही पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या, डिझेलवर धावणाऱ्या कार, बस, ट्रक विकल्या जाणार नाहीत. ट्रान्सपोर्टेशनचं पूर्ण मार्केटच बदलून जाईल आणि लोक इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्या वापरतील. पेट्रोल-डिझेलच्या किमती कोसळतील आणि पेट्रोलिअम उद्योगानं जे राज्य जगावर केलं ते ही संपेल असा भविष्यकालीन अभ्यासपूर्ण दावा स्टॅण्फोर्ड विद्यापीठातील अर्थतज्ज्ञ टोनी सेबा यांनी केला आहे. ‘रिथिंकिंग ट्रान्सपोर्टेशन २०२०-२०३० हा अभ्यास त्यांनी नुकताच प्रसिद्ध केला. आणि तो अभ्यास वाहन उद्योग, पेट्रोल उद्योग, पर्यावरण ते अर्थव्यवस्थांमधील बदल अभ्यासणारे तज्ज्ञ यांसाऱ्या जगात तो अभ्यास चर्चेचा विषय ठरलेला आहे.
टोनी सेबा यांचं म्हणणं आहे की, येत्या काळात लोक गाड्या चालवणंच बंद करतील. सेल्फ ड्राईव्ह इलेक्ट्रिक व्हेइकल्सना ( इव्ही) मागणी वाढेल. येत्या काळात ही इलेक्ट्रिक व्हेइकल्स वापरणं सध्या वापरत असलेल्या पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांपेक्षा १० पट स्वस्त पडेल.

 


जे लोक फार नॉस्टेल्जिक असतील, आठवणीत रमत बसतील तेच फक्त सवय म्हणून कार घेवून ठेवतील. जुनी कार दारात उभी करतील. मात्र बाकीचे काळासोबत नवीन वाहन स्वीकारतील. यापुढच्या काळात पेट्रोल पंप सापडणं, स्पेअर पार्ट मिळणं हेच अवघड होवून जाईल. कारण पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्याच कमी होतील. कार डिलर ही गोष्ट २०२४ पर्यंत संपूनच जाईल.
हेच नाही तर अनेक शहरात ड्रायव्हर म्हणून गाडी चालवण्याची मानवाला परवानगी देणंच बंद होवून जाईल. कारण मनुष्य वाहनचालक हा किती धोकादायक गाड्या चालवतो, किती अपघात होतात हे जग पाहतं आहेच. कदाचित उपनगरातच फक्त गाड्या चालतील. अनेक गाड्यांची विल्हेवाट लावली जाईल. सेकंड हॅण्ड गाड्यांचे भाव तर उतरतीलच. पण काळ असाही येईल की तुम्हाला तुमची गाडी विकायला पैसे द्यावे लागतील.
आॅईल आणि वाहन उद्योगाला याचा मोठा तडाखा बसेल असा त्यांचा अभ्यास आहे. क्रूड आॅईलच्या किमती पडतील आणि २५ युएस डॉलर प्रती डॉलर इतक्या त्या खाली येतील.जनरेशन नेक्स्टची कार ही कम्प्युटर आॅन व्हील या तत्वानं चालेल. आॅटो कार, इलेक्ट्रिक कार चा जमान येईल असा हा अभ्यास सांगतो. आणि जगभरातल्या उद्योगांवर याचा काय परिणाम होईल याचा तपशिलही देतो. सामान्य माणसाच्या प्रवासात बदल होवू घातला आहे, हे मात्र हा अभ्यास वारंवार अधोरेखित करतो.


अधिक माहितीसाठी प्रो.टोनी यांचा हा एक व्हिडीओ इथं पाहता येईल

 

 

Web Title: Petrol cars will be destroyed in the next 8 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.