एका झटक्यात 40 रुपयांनी स्वस्त झालं पेट्रोल; 'या' शेजारच्या देशानं जनतेला दिला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 11:32 PM2022-10-01T23:32:02+5:302022-10-01T23:35:10+5:30

अशी स्थितीत, पेट्रोलची किंमत कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा थेट फायदा झाला आहे. मात्र व्यापारी वर्गाच्या अडचणी आहेत, तशाच आहेत.

petrol price 40 rs slash in srilanka no change in diesel know about latest rate | एका झटक्यात 40 रुपयांनी स्वस्त झालं पेट्रोल; 'या' शेजारच्या देशानं जनतेला दिला मोठा दिलासा

एका झटक्यात 40 रुपयांनी स्वस्त झालं पेट्रोल; 'या' शेजारच्या देशानं जनतेला दिला मोठा दिलासा

googlenewsNext

जबरदस्त आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकन सरकारने आपल्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. श्रीलंकन सरकारने पेट्रोलच्या दरात लिटरमागे तब्बल 40 रुपयांची कपात केली आहे. यासंदर्भात घोषणा करताना, आता पेट्रोलचा नवा दर प्रति लिटर 410 श्रीलंकन ​​रुपये एवढा असेल, असे ऊर्जा मंत्री कांचन विजयशेखर यांनी म्हटले आहे. या कपातीपूर्वी येथे पेट्रोलचा दर 450 श्रीलंकन रुपये एवढा होता.

आता डिझेल पेट्रोलपेक्षा महाग - 
श्रीलंकन सरकारच्या या घोषणेनंतर देशात पहिल्यांदाच डिझेल पेट्रोलपेक्षा महाग झाले आहे. सध्या श्रीलंकेत डिझेलचा दर 430 श्रीलंकन रुपये प्रति लीटर आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याचबरोबर व्यापाऱ्यांचा माल एका भागातून दुसऱ्या भागात नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये डिझेलचा वापर अधिक होतो.

कुणाला दिलासा, कुणाला झटका? - 
सध्या श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटांचा सामना करत आहे. अशी स्थितीत, पेट्रोलची किंमत कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा थेट फायदा झाला आहे. मात्र व्यापारी वर्गाच्या अडचणी आहेत, तशाच आहेत. या लोकांसाठी डिझेलचा दर कमी न होणे हा एक झटकाच आहे.

Web Title: petrol price 40 rs slash in srilanka no change in diesel know about latest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.