Covid Vaccine: डेल्टा व्हेरिअंट विरोधात फायझर, मॉडर्ना लसींचा प्रभाव कमी; फक्त ६६ टक्के प्रभावी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 01:16 PM2021-08-25T13:16:13+5:302021-08-25T13:19:36+5:30

अमेरिकी आरोग्य कार्यकर्त्यांनी प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार फायझर आणि मॉडर्ना लसी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटविरोधात कमी प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.

Pfizer and Moderna Vaccine less effective on Delta variants, only 66 percent effective against 91 percent | Covid Vaccine: डेल्टा व्हेरिअंट विरोधात फायझर, मॉडर्ना लसींचा प्रभाव कमी; फक्त ६६ टक्के प्रभावी!

Covid Vaccine: डेल्टा व्हेरिअंट विरोधात फायझर, मॉडर्ना लसींचा प्रभाव कमी; फक्त ६६ टक्के प्रभावी!

Next

अमेरिकी आरोग्य कार्यकर्त्यांनी प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार फायझर आणि मॉडर्ना लसी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटविरोधात कमी प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. यात दोन्ही लसींची प्रभावी क्षमता ९१ टक्क्यांवरुन घसरुन थेट ६६ टक्क्यांवर आली आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनकडून (सीडीसी) या दोन लसीच्या वास्तविक स्वरुपात मानवी शरीरावर होत दिसून येत असलेल्या प्रभावाची चाचणी केली जात आहे. याच दोन लसींना सर्वात आधी फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनद्वारे अधिकृत मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे या दोन लसींचा डेल्टा व्हेरिअंटविरोधातील प्रभावी क्षमतेची चाचणी केली जात आहे. (Pfizer and Moderna Vaccine less effective on Delta variants, only 66 percent effective against 91 percent)

फायझर आणि मॉडर्ना लस दिलेल्या सहा राज्यातील हजारो स्वयंसेवकांवर साप्ताहिकरित्या कोविड-१९ च्या लक्षणांबाबत लक्ष ठेवण्यात आलं होतं. यात संशोधकांना सिम्टमॅटिक आणि असिम्टमॅटिक लक्षणांविरोधात प्रभावी क्षमतेचा अंदाज लावण्याची मंजुरी मिळाली. त्यानंतर करण्यात आलेल्या अभ्यासात लस देण्यात आलेल्या आणि लस न घेतलेल्या व्यक्तींमध्ये व्हायरसच्या संक्रमणाबाबत सविस्तर माहिती ट्रॅक करण्यात आली. यात १४ डिसेंबर २०२० पासून १० एप्रिल २०२१ पर्यंतच्या अभ्यासात लसींची परिणामकारकता ९१ टक्के इतकी नोंदविण्यात आली होती. म्हणजेच मॉडर्ना लसीच्या दोन डोसनंतर कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण ९१ टक्क्यांनी कमी होऊ शकतं असं अभ्यासात समोर आलं होतं. 

डेल्टा व्हेरिअंटविरोधात केवळ ६६ टक्के प्रभावी
१४ ऑगस्टपर्यंत करण्यात आलेल्या अभ्यासात मॉडर्ना आणि फायझरची लस डेल्टा व्हेरिअंट विरोधात कमी प्रभावी असल्याचं निदर्शनास आलं आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना डेल्टा व्हेरिअंटविरोधात केवळ ६६ टक्के इतकीच सुरक्षा मिळते. याशिवाय येत्या काळात हे प्रमाण आणखीही कमी होऊ शकतं असा इशाराही देण्यात आला आहे. 

Web Title: Pfizer and Moderna Vaccine less effective on Delta variants, only 66 percent effective against 91 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.