Corona Vaccine: चिंताजनक! कोरोना लस टोचल्यावर नॉर्वेत १३ जणांचा मृत्यू; लसीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
By कुणाल गवाणकर | Published: January 15, 2021 01:50 PM2021-01-15T13:50:31+5:302021-01-15T13:51:00+5:30
Corona Pfizer Vaccine: आतापर्यंत देशात ३३ हजार जणांना टोचण्यात आली फायझरची लस
ऑस्लो: गेलं वर्ष कोरोना संकटाचं सामना करण्यात गेल्यानंतर नव्या वर्षात जगातल्या बऱ्याचशा देशांमध्ये लसीकरणास सुरुवात झाली आहे. काही देशांमध्ये कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स जाणवू लागले आहेत. युरोपातल्या नॉर्वेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नॉर्वेत नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात लसीकरणास सुरुवात झाली. लस टोचण्यात आल्यावर तिचे साईड इफेक्ट्स दिसतील, अशी माहिती नॉर्वे सरकारकडून आधीच देण्यात आली होती. नॉर्वेत आतापर्यंत ३३ हजार जणांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत २९ जणांमध्ये साईड इफेक्ट्स दिसून आले असून यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. नॉर्वेत नागरिकांना फायझरची लस (Corona Pfizer Vaccine) दिली जात आहे.
रशियन वृत्तसंस्था स्पुटनिकच्या वृत्तानुसार, नॉर्वेच्या औषध संस्थेचे प्रमुख वैद्यकीय संचालक स्टेइनार मॅडसेन यांनी देशाचे राष्ट्रीय प्रसारक एनआरकेशी संवाद साधला. 'आतापर्यंत कोरोना लस देण्यात आलेल्या २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १३ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ९ जणांना गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट्स जाणवले. तर ७ जणांमध्ये आढळून आलेल्या साईड इफेक्ट्सचं स्वरुप गंभीर नव्हतं,' अशी माहिती मॅडसेन यांनी दिली.
कोरोनामुक्त रुग्णही पसरवू शकतात संसर्ग, शास्त्रज्ञांच्या दाव्याने चिंता वाढली
लसीकरणानंतर मृत्यूमुखी पडलेले सगळे जण वयोवृद्ध असं मॅडसेन यांनी सांगितलं. 'लस टोचण्यात आल्यानंतर मृत्यू पावलेल्या लोकांची तपासणी करण्यात आली. यातील सगळेजण वयोवृद्ध होते. ते नर्सिंग होममध्ये राहायचे. या सगळ्यांचं वय ८० च्या पुढे होतं. या व्यक्ती आजारी होत्या. कोरोना लस देण्यात आल्यानंतर त्यांना ताप आला. सोबतच त्यांना अस्वस्थतेचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि ते मृत्यूमुखी पडले,' असं मॅडसेन यांनी सांगितलं.
दुर्लक्ष नको! आता वेगळ्या क्रमाने दिसू लागली कोरोनाची लक्षणे, आधी येतो ताप मग सुरू होते अंगदुखी....
नॉर्वेमध्ये घडलेला प्रकार प्रकार दुर्मीळ असल्याची माहिती स्टेइनार मॅडसेन यांनी दिली. 'देशात हजारो लोकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या रुग्णांचाही समावेश आहे. हृदयाशी संबंधित आजार, डिमेन्शिया यासह विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना लस दिली गेली. मात्र त्यांना कोणताही धोका जाणवला नाही. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही,' असं मॅडसेन यांनी म्हटलं.