म्हणून फिलिपिन्स सरकारने 68 आलिशान कारवर चालवला बुलडोझर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 11:49 AM2018-08-02T11:49:28+5:302018-08-02T11:50:36+5:30
फिलिपिन्स सरकारने परदेशातून आयात करण्यात आलेल्या 68 आलिशान कारवर बुलडोझर चालवला आहे.
मनिला - फिलिपिन्स सरकारने परदेशातून आयात करण्यात आलेल्या 68 आलिशान कारवर बुलडोझर चालवला आहे. फिलिपिन्समध्ये अवैधरीत्या आयात करण्यात आलेल्या वस्तूंवर कठोर कारवाई करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून परदेशातून अवैधरीत्या आयात करण्यात आलेल्या सुमारे 70 लाख डॉलर किमतीच्या 68 कारचा सार्वजनिकरीत्या चुराडा करण्यात आला.
ही कारवाई पाहण्यासाठी फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो रोआ डुतेर्ते स्वत: उपस्थित होते. बुलडोझर चालवून नष्ट करण्यात आलेल्या आलिशान कारमध्ये लेम्बोर्गिनी आणि पॉर्श आदी कंपन्यांच्या कारचा समावेश आहे. या कारवरील आयात कर न भरता दक्षिण आशियात पाठवण्यात आल्या होत्या दरम्यान, या कारवर बुलडोझर चालवतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
President Duterte witnesses destruction of smuggled luxury vehicles at Port Irene in Cagayan. pic.twitter.com/GwuuTjFI1k
— Dharel Placido (@dgplacido) July 30, 2018
फिलिपिन्समध्ये आयात आलिशान कारवर मोठ्या प्रमाणात कर आकारण्यात येतो. आयात करण्यात आलेल्या आलिशान कारवर तिच्या खरेदी किमतीवर 40 टक्के आयात कर द्यावा लागतो. त्यामुळे फिलिपिन्समध्ये महागड्या कारची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते.