Philippines Landslide: भूस्खलनाने कुटुंब हिरावलं, पण तो वाचला; 20 तास फ्रीजमध्ये अडकला, बचाव पथकाने केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 10:18 AM2022-04-21T10:18:18+5:302022-04-21T10:18:34+5:30

Philippines Landslide: शुक्रवारी फिलीपिन्समध्ये झालेल्या भूस्खलनात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. या मोठ्या घटनेतून एका 11 वर्षीय मुलाचा चमत्कारीकरित्या जीव वाचला.

Philippines Landslide: 11 year old boy miraculously survives landslide by taking refuge in refrigerator for 20 hours | Philippines Landslide: भूस्खलनाने कुटुंब हिरावलं, पण तो वाचला; 20 तास फ्रीजमध्ये अडकला, बचाव पथकाने केली सुटका

Philippines Landslide: भूस्खलनाने कुटुंब हिरावलं, पण तो वाचला; 20 तास फ्रीजमध्ये अडकला, बचाव पथकाने केली सुटका

Next

Philippines Landslide: शुक्रवारी फिलीपिन्स देशात भूस्खलनाची मोठी घटना घडली. पण, या दुर्घटनेतून 11 वर्षीय मुलगा चमत्कारीकरित्या वाचला आहे. जीव वाचवण्यासाठी हा मुलगा दिवसभर एका फ्रीजमध्ये लपून बसला. न्यूयॉर्क पोस्टनुसार, बेबे शहरातील रहिवासी असलेला सीजे जस्मे नावाचा हा मुलगा आपल्या कुटुंबासह घरात बसला होता, तेव्हा अचानक मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. यात त्याचे संपूर्ण कुटुंब वाहून गेले, पण तो एकटा वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी बेबे शहरात मॅगी वादळ धडकले, यादरम्यान मोठ्या प्रमाणात भूस्खलनाची घटना घडली. यामुळे सीजे याच्या घरात मोठ्या प्रमाणात चिखल येऊ लागला. यातून वाचण्यासाठी तो घरातील फ्रीजमध्ये लपून बसला. वादळ शांत होईपर्यंत म्हणजेच, सूमारे 20 तास तो फ्रीजमध्ये होता. यादरम्यान, तो बेशुद्ध पडला. नंतर बवाच पथकाला नदीकिनारी एक तुटलेल्या अवस्थेतील फ्रीज दिसले, त्यात त्यांना सीजे जस्मे आढळला. 

बचाव पथकाने सांगितल्यानुसार, त्यांना जेव्हा जस्मे आढळून आला, तेव्हा तो शुद्धीवर नव्हता. बचाव पथकाने तात्काळ त्याला रुग्णालयात पाठवले. या भूस्खलनात त्याच्या पायाचे हाड मोडले, पण सुदैवाने त्याचा जीव वाचला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बचाव पथकाने दिली आहे. 

जस्मेचे कुटुंबीय बेपत्ता
फ्रीजमध्ये राहिल्यामळे जस्मेचा जीव वाचला, पण अद्याप त्याच्या कुटुंबाचा शोध लागलेला नाही. बचाव पथकाने सांगितले की, त्याची आई आणि धाकटा भाऊ बेपत्ता आहेत, तर त्याच्या वडिलांचा गुरुवारी झालेल्या भूस्खलनात मृत्यू झालाय. दरम्यान, वादळानंतर एकट्या बेबे येथे सुमारे 200 ग्रामस्थ जखमी झाले असून सुमारे 172 जणांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे 200 दशलक्षाहून अधिक लोकांना घर सोडावे लागले आहे. 

Web Title: Philippines Landslide: 11 year old boy miraculously survives landslide by taking refuge in refrigerator for 20 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.