भयंकर! 5 वर्षांपासून "ती" पिंजऱ्यात आहे बंदिस्त, मन सुन्न करणारी घटना; कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 05:06 PM2021-01-19T17:06:17+5:302021-01-19T17:08:59+5:30

गेल्या पाच वर्षांपासून एक तरुणी पिंजऱ्यात बंदिस्त असल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

philippines mentally ill woman has been locked in cage by her relatives picture goes viral | भयंकर! 5 वर्षांपासून "ती" पिंजऱ्यात आहे बंदिस्त, मन सुन्न करणारी घटना; कारण ऐकून बसेल धक्का

भयंकर! 5 वर्षांपासून "ती" पिंजऱ्यात आहे बंदिस्त, मन सुन्न करणारी घटना; कारण ऐकून बसेल धक्का

Next

मनीला - जगभरातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून एक तरुणी पिंजऱ्यात बंदिस्त असल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. फिलिपाईन्समध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. तरुणाच्या कुटुंबीयांनीच तिला पिंजऱ्यात कैद केलं आहे. 2014 पर्यंत ही तरुणी एका सामान्य मुलीसारखं मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचं स्वप्न पाहत होती. मात्र अचानक तिच्या आयुष्यात मोठा बदल झाला. एका आजाराने ग्रासल्याने तिच्या कुटुंबीयांना तिला नाईलाजाने पिंजऱ्यात कैद करावं लागल्याची माहिती मिळत आहे. 

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीला एका मानसिक आजाराने ग्रासलं आहे. मात्र तिच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसे नाहीत. 2014 पर्यंत ती फिलिपाईन्समध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. तेथील एका स्थानिक दुकानात ती काम करत होती. याच  दरम्यान ती आजारी असल्याचं देखील समोर आलं. तिच्या मानसिक आजाराबाबत खुलासा झाला. तरुणीला मतिभ्रम झाला आहे. तिला उपचारासाठी नेगारोस प्रांतात एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जवळपास एक वर्षाच्या उपचारानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती.

प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तरुणीला घरी जाण्याची परवागनी देण्यात आली. मात्र 2015 मध्ये तिच्या वडिलांची प्रकृती बिघडली आणि सर्वच गोष्टी बदलल्या. तरुणीवर तिचे कुटुंबीय उपचार करू शकले नाहीत. 'डेली मेल'ने दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबाचे निकटवर्तीय ग्लयजेल बुल्लोस यांनी तरुणी एकदा प्रचंड हिंसक झाली होती. त्यामुळे तिच्या सुरक्षितेसाठी तिला पिंजऱ्यात बंदिस्त करावं लागलं. तरुणी ही कधीकधी अचानक हिंसक होऊन घरातील वस्तू शेजाऱ्यांवर फेकत असल्याचं देखील सांगितलं. 

एकदा तरुणी घरातून बाहेर पडली होती आणि जवळपास एक आठवड्यानंतर ती सेबू प्रांतात सापडली. तरुणी  घरातून जाऊ नये यासाठी तिला घरातच बनवण्यात आलेल्या एका पिंजऱ्यात कैद केलं आहे. पिंजऱ्यातच तिला जेवणही दिलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच कुटुंबीयांकडून तिच्यावर उपचार करण्यासाठी पैसे जमवण्याचे काम सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: philippines mentally ill woman has been locked in cage by her relatives picture goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.