इसिसमध्ये भरती होण्यासाठी भारतीय तरुणांची माथी भडकवणा-या महिलेला फिलीपाईन्समध्ये अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 01:10 PM2017-10-21T13:10:43+5:302017-10-21T13:21:42+5:30

भारतीय तरुणांमध्ये कट्टरपंथीय विचारधारा भिनवून त्यांना इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणारी महिला कारेन आयशा हमीडॉनला फिलीपाईन्समधून अटक करण्यात आली आहे.

Philippines nab IS operative for radicalizing Indian youth | इसिसमध्ये भरती होण्यासाठी भारतीय तरुणांची माथी भडकवणा-या महिलेला फिलीपाईन्समध्ये अटक

इसिसमध्ये भरती होण्यासाठी भारतीय तरुणांची माथी भडकवणा-या महिलेला फिलीपाईन्समध्ये अटक

Next
ठळक मुद्देआयशा हमीडॉनचा पती मोहम्मद जाफर माकवीद फिलीपाईन्समधला दहशतवादी होता. फेसबुक, टेलिग्राम चॅनल आणि व्हॉटस अॅप या सोशल माध्यमांचा वापर करुन ती भारतीय तसेच अन्य देशातील तरुणांची माथी भडकवत होती.

मनिला - भारतीय तरुणांमध्ये कट्टरपंथीय विचारधारा भिनवून त्यांना इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणारी महिला कारेन आयशा हमीडॉनला फिलीपाईन्समधून अटक करण्यात आली आहे. एनबीआयच्या विशेष  पथकाने मनिला येथील घरातून कारेन आयशाला अटक केली. कारेन आयशा भारतीय वंशाची आहे. भारत आणि अन्य देशातील जास्तीत जास्त तरुणांनी इसिसमध्ये सहभागी व्हावे यासाठी इससिच्या ऑनलाइन प्रचारात ती महत्वाची भूमिका बजावत होती. 

आयशा हमीडॉनचा पती मोहम्मद जाफर माकवीद फिलीपाईन्समधला दहशतवादी होता. त्याच्या मृत्यूनंतर आयशा इसिसाठी काम करत होती. सर्वप्रथम भारतीय तपास यंत्रणेला 2016 मध्ये आयशा हमीडॉनच्या ऑनलाइन कारवायांची माहिती मिळाली. त्यानंतर भारताने अन्य देशांना तिच्याबद्दल सर्तक केले. फेसबुक, टेलिग्राम चॅनल आणि व्हॉटस अॅप या सोशल माध्यमांचा वापर करुन ती भारतीय तसेच अन्य देशातील तरुणांची माथी भडकवत होती. तरुणांमध्ये कट्टरपंथीय विचारधारा भिनवून त्यांना इसिसमध्ये आणण्याची जबाबदारी तिच्यावर होती. 

अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती इसिसच्यावतीने काम करत होती. अनेक देशातील तपास यंत्रणा तिच्या मागावर होत्या. भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने मागच्यावर्षी फिलीपाईन्सला पत्र लिहून कारेनची माहिती आणि पुरावे देण्याची विनंती केली होती. एनआयएने पत्रामध्ये तिचा पत्ता आणि अन्य माहिती दिली होता. तिच्या अटकेमुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासाला अधिक बळ मिळणार आहे. तिच्या चौकशीची परवानगी मिळावी यासाठी एनआयएकडून फिलीपाईन्सला सरकारला विनंती करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे इसिसच्या भारतातील नेटवर्कची माहिती मिळू शकते. व्हिडिओ कॉन्फरन्ससिंग किंवा प्रत्यक्षात फिलिपाईन्सला पथक पाठवून तिची चौकशी करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. 

Web Title: Philippines nab IS operative for radicalizing Indian youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.