भारतातून एकाने फोन केला -ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 03:57 AM2018-09-12T03:57:31+5:302018-09-12T03:57:44+5:30
भारताबरोबरच्या व्यापारासंदर्भातील काही मुद्यांवर कठोर भूमिका घेतल्यानंतरही त्या देशाला अमेरिकेशी व्यापार करार करण्याची इच्छा आहे
वॉशिंग्टन : भारताबरोबरच्या व्यापारासंदर्भातील काही मुद्यांवर कठोर भूमिका घेतल्यानंतरही त्या देशाला अमेरिकेशी व्यापार करार करण्याची इच्छा आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. तसा दूरध्वनी भारतातून एका व्यक्तीने आम्हाला केला होता, असे त्यांनी सांगितले; पण त्याचे नाव मात्र उघड केले नाही.
विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेचा इतर कोणत्याही देशांपेक्षा झपाट्याने विकास होत असतो. अमेरिकी उत्पादनांवर भारत १०० टक्के आयात शुल्क लादत असल्याचा आक्षेप घेऊन ट्रम्प म्हणाले की, भारत व चीन या देशांच्या विकसनशील देशांना व्यापारात अमेरिकेकडून देण्यात येणारी सबसिडी बंद करायला हवी, अशी भूमिका मी घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतातील एकाने दूरध्वनीवरून संपर्क साधला. ट्रम्प म्हणाले की, पूर्वीपासून दोन्ही देशांत ज्या रीतीने व्यापार सुरू आहे त्याने भारतालाच फायदा होत होत आहे. (वृत्तसंस्था)