'त्या' फोनमुळे ट्रम्पना धोका
By admin | Published: January 26, 2017 05:59 PM2017-01-26T17:59:49+5:302017-01-26T23:09:15+5:30
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अजूनही असुरक्षित अँड्रॉइड फोन वापरत असल्याची धक्कादायक माहिती न्यूयॉर्क टाइम्सनं दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 26 - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अजूनही असुरक्षित अँड्रॉइड फोन वापरत असल्याची धक्कादायक माहिती न्यूयॉर्क टाइम्सनं दिली आहे. आतापर्यंत व्हाइट हाऊसनं अनेक राष्ट्राध्यक्ष पाहिले, मात्र एवढा जुना आणि असुरक्षित फोन वापरणारे ट्रम्प हे व्हाइट हाऊसच्या इतिहासात पहिलेच राष्ट्राध्यक्ष असावेत. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्याच सहका-यांनी हा फोन वापरणा-यास त्यांना विरोध केला होता. मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानचा ट्रम्प आजही हा फोन वापरतात.
ट्रम्प यांच्याकडे सॅमसंग कंपनीचा जुना फोन असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्प या फोनवरून गुप्तरीत्या माहिती गोळा करत असल्यानं सॅमसंगचा हा फोन कायम वादाच्या केंद्रस्थानी असतो. सिक्रेट सर्व्हिस एजन्सीच्या माध्यमातून ट्रम्प यांनी याच फोनवर एक सुरक्षित, एन्क्रिप्टेड डिव्हाइससह नवीन नंबर घेऊन काही अधिका-यांनाही तो दिला असून, याच फोनवरून ट्रम्प माहितीची देवाण-घेवाण करत असतात.
तसेच या असुरक्षित अँड्रॉइस फोनवरूनच ते अनेक ट्विट्स करतात. व्हाइट हाऊसनं ट्रम्प यांना हा फोन बदलण्याची सूचना केली असता, 'शब्द फक्त हवेत विस्फोट घडवतात,' असं म्हणत ट्रम्प यांनी हा फोन बदलण्यासही नकार दिला आहे.