इराणच्या मिसाइलवर स्पेनच्या पंतप्रधानांचा फोटो! 'या' एका कारणामुळे इराणमध्ये पेड्रो सांचेज झाले 'हिरो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 08:00 IST2026-03-23T07:59:47+5:302026-03-23T08:00:14+5:30

Iran Missile Pedro Sanchez Photo Viral: इराणच्या बॅलिस्टिक मिसाइलवर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांचा फोटो व्हायरल. अमेरिका-इस्रायल हल्ल्यांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेमुळे इराणमध्ये सांचेज यांचे कौतुक. वाचा सविस्तर बातमी.

Photo of Spanish Prime Minister on Iranian missile! Pedro Sanchez became a 'hero' in Iran for 'this' reason | इराणच्या मिसाइलवर स्पेनच्या पंतप्रधानांचा फोटो! 'या' एका कारणामुळे इराणमध्ये पेड्रो सांचेज झाले 'हिरो'

इराणच्या मिसाइलवर स्पेनच्या पंतप्रधानांचा फोटो! 'या' एका कारणामुळे इराणमध्ये पेड्रो सांचेज झाले 'हिरो'

मध्य पूर्वेतील युद्धाच्या रणधुमाळीत सध्या सोशल मीडियावर एक अजब फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा एक जवान बॅलिस्टिक मिसाइलवर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांचा फोटो असलेले स्टीकर चिकटवताना दिसत आहे. इराणने आपल्या मिसाइलवर एका पाश्चात्य देशाच्या नेत्याचा फोटो लावून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

इराणने का दिले सांचेज यांना हे 'क्रेडिट'?
पेड्रो सांचेज हे अशा मोजक्या पाश्चात्य नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांची कडक शब्दांत टीका केली आहे. सांचेज यांनी या युद्धाला "बेकायदेशीर" आणि "अन्यायकारक" म्हटले होते. जेव्हा बहुतेक पाश्चात्य देश अमेरिकेच्या बाजूने उभे होते, तेव्हा सांचेज यांनी इराणच्या समर्थनार्थ आणि शांततेच्या बाजूने भूमिका घेतली. इराणच्या जनतेने आणि लष्कराने सांचेज यांच्या या भूमिकेचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले असून, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिसाइलवर त्यांचे फोटो लावण्याचा हा अनोखा मार्ग निवडला आहे.

ट्रम्प आणि सांचेज यांच्यात जुंपली:
सांचेज यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापले आहेत. ट्रम्प यांनी स्पेनला "भयानक मित्र" म्हटले असून स्पेनसोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. तरीही सांचेज आपल्या 'नो टू वॉर' या भूमिकेवर ठाम आहेत.

भारतावरही होणार परिणाम?
इराण आणि इस्रायल-अमेरिका युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. इंधनाचे वाढते दर आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे भारतासारख्या विकसनशील देशांना महागाईचा फटका बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Web Title : ईरान के मिसाइल पर स्पेन के पीएम की तस्वीर: इस रुख ने बनाया हीरो

Web Summary : ईरान ने स्पेन के पीएम सांचेज़ की अमेरिका-इज़राइल की आलोचना के लिए सराहना की, मिसाइल पर उनकी तस्वीर लगाई। ट्रंप ने सांचेज़ के रुख की आलोचना की। संघर्ष वैश्विक अर्थव्यवस्था को प्रभावित करता है, संभावित रूप से भारत पर असर पड़ेगा।

Web Title : Spain PM's photo on Iranian missile: A stance made him hero.

Web Summary : Iran lauded Spain's PM Sánchez for criticizing US-Israel actions, placing his photo on a missile. Trump criticized Sánchez's stance. The conflict impacts global economy, potentially affecting India.