पिकासोंची चित्रकृती सर्वाधिक महाग!
By Admin | Published: May 12, 2015 11:22 PM2015-05-12T23:22:30+5:302015-05-12T23:22:30+5:30
जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या पेंटिंगने एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांची एक चित्रकृती जगात सर्वाधिक किमतीला विकली गेली.
न्यूयॉर्क : जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या पेंटिंगने एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांची एक चित्रकृती जगात सर्वाधिक किमतीला विकली गेली.
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात पिकासो यांच्या ‘द विमेन आॅफ अल्जिअर्स’ (अल्जिअर्सच्या बाया) नामक चित्रकृतीचा तब्बल १८ कोटी डॉलरमध्ये लिलाव झाला. यामुळे आतापर्यंतचे कलाकृतीच्या लिलावाचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत.
दरम्यान, एका खास शैलीतील या रंगीत चित्रकृतीत नग्न वेश्यांचे एक दृश्य आहे. स्पॅनिश चित्रकार पिकासो यांनी १९५४-५५ मध्ये ही कलाकृती साकारली होती. ही कलाकृती म्हणजे त्यांच्या १५ पेंटिंगच्या मालिकेचा हिस्सा आहे. आपला मित्र व स्पर्धक हेन्री मत्स्सी यांच्या निधनानंतर पिकासो यांनी ही कलाकृती साकारली होती. चित्रकृती लिलावाचा यापूर्वीचा विक्रम १४.२४ कोटी डॉलरचा आहे. ब्रिटनचे चित्रकार फ्रान्सिस बेकन यांची ख्यातकीर्त कलाकृती ‘थ्री स्टडीज आॅफ ल्यूशिअर फ्रायड’च्या विक्रीतून ही रक्कम मिळाली होती. २०१३ मध्ये हा लिलाव झाला होता. (वृत्तसंस्था)