Corona Virus : "पार्किंगमध्ये मृतदेहांचा ढीग, जबरदस्तीने फॉर्मवर केली जातेय सही"; Video ने केली चीनची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 03:03 PM2022-12-28T15:03:40+5:302022-12-28T15:10:01+5:30

Covid Cases In China: दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कोट्यवधीच्या घरात असल्याचा दावा केला जात आहे. तर त्याच वेळी, चीन संक्रमित आणि मृत्यूची संख्या लपवण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहे.

pile of dead bodies in parking lot china video surfaced of uproar from corona virus | Corona Virus : "पार्किंगमध्ये मृतदेहांचा ढीग, जबरदस्तीने फॉर्मवर केली जातेय सही"; Video ने केली चीनची पोलखोल

Corona Virus : "पार्किंगमध्ये मृतदेहांचा ढीग, जबरदस्तीने फॉर्मवर केली जातेय सही"; Video ने केली चीनची पोलखोल

googlenewsNext

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कोट्यवधीच्या घरात असल्याचा दावा केला जात आहे. तर त्याच वेळी, चीन संक्रमित आणि मृत्यूची संख्या लपवण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहे. दरम्यान, चीनमधून काही व्हिडीओ समोर आले आहेत जे या दाव्यांचे समर्थन करत आहेत. ह्यूमन राइट एक्टिविस्ट जेनिफर झेंग यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे चीनमधील गंभीर परिस्थिती पाहायला मिळते. 

जेनिफरने लिहिले की, "24 डिसेंबर शांघाई सिटी हॉस्पिटल..." व्हिडिओंमध्ये हॉस्पिटलच्या मजल्यावर मृतदेहांचा ढीग दिसत आहे. यासोबतच जेनिफरने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे जो एंसन शहरातील आहे. यामध्ये फ्यूनरल होम पूर्णपणे मृतदेहांच्या ढिगाऱ्याने भरलेले दिसत आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा एवढा आहे की, फ्यूनरल होमच्या पार्किंगमध्ये मृतदेह ठेवण्यात येत आहेत. 

अंत्यसंस्कारासाठी अनेक किलोमीटरची लाईन 

परिस्थिती इतकी बिघडली आहे की मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक किलोमीटरची लाईन लागली आहे. शांघाई शहरातील स्मशानभूमीत भरती सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकांना सांगितले जात आहे की जे लोक मृतदेह उचलू शकतात ते अर्ज करू शकतात. हे आकडे जगासमोर येऊ नयेत यासाठी चीन आता एक नवीन युक्ती वापरत आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, रुग्णालयातून मृतदेह घेण्यासाठी येणाऱ्यांना एका फॉर्मवर सही करायला लावली जात आहे. 

मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट शब्दात लिहिले आहे. बीजिंगच्या फ्युनरल होमला दिलेल्या नोटीसनुसार, कोणताही कर्मचारी मीडिया संस्थेशी बोलणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. यासोबतच कोणत्याही प्रकारचा डेटा शेअर करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.त्याचवेळी आता चीनबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनने 8 जानेवारीपासून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनमधून सूट जाहीर केली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय सीमाही खुली करण्याची चर्चा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: pile of dead bodies in parking lot china video surfaced of uproar from corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.