बाळ होण्यासाठी घेतल्या गोळ्या, झाली विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 06:02 AM2023-08-09T06:02:20+5:302023-08-09T06:04:37+5:30
डॉक्टर म्हणाले. ते औषध घेऊ नका
टोरंटो : कॅनडातील एका महिलेला पोटदुखी आणि उलट्यांमुळे वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत होते. वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी तिने वर्षभराहून अधिक काळ आयुर्वेदिक गोळ्या घेतल्याने तिला शिशाची विषबाधा झाल्याचे आढळून आले आहे.
३९ वर्षीय महिलेने ६ आठवड्यांत ३ वेळा ओटीपोटात दुखणे, बद्धकोष्ठता, मळमळ आणि उलट्यांसाठी रुग्णालयात उपचार घेतले होते. तिसऱ्यांदा तिला जठर व आतड्यांतील रक्तस्रावासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवड्यांनंतर तिला पुन्हा तपासणीसाठी बोलावले तेव्हा तिने वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ रोज आयुर्वेदिक औषधे घेतल्याचे सांगितले. रुग्णाची ‘केस हिस्ट्री‘ काळजीपूर्वक नोंदवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
डॉक्टरांनी दिला इशारा
n सदर महिलेत शिशाच्या विषारीपणाचे निदान झाल्यानंतर, रुग्णाने घेतलेल्या १७ वेगवेगळ्या औषधी गोळ्यांची चाचणी झाली. तिच्या रक्तातील शिशाची पातळी ५५ मायक्रोग्रॅम प्रतिडेसिलिटरपेक्षाही जास्त निघाली. सामान्य पातळी २ डेसिलिटर असते.
n आयुर्वेदिक औषधी विक्री दुकानात संयुक्त तपासणी करण्यात आली. नैसर्गिक आरोग्य उत्पादने नियमांचे पालन न केल्यामुळे शेकडो गोळ्या जप्त करण्यात आल्या. कॅनडाच्या आरोग्य विभागाने नागरिकांना या गोळ्या न वापरण्याचा इशारा दिला आहे.