बापरे! 271 प्रवासी असलेल्या विमानाच्या पायलटचा अचानक मृत्यू; 'असं' झालं इमर्जन्सी लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 10:10 AM2023-08-19T10:10:32+5:302023-08-19T10:15:53+5:30

271 प्रवाशांसह मियामीहून चिलीला जाणाऱ्या कमर्शियल फ्लाइटमध्ये कोणीही विचार केला नसेल असं घडलं आहे. 

pilot dies in flight bathroom with 271 onboard co pilots make emergency landing | बापरे! 271 प्रवासी असलेल्या विमानाच्या पायलटचा अचानक मृत्यू; 'असं' झालं इमर्जन्सी लँडिंग

फोटो - आजतक

googlenewsNext

विमान हवेत असताना पायलटची तब्येत बिघडल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशा परिस्थितीत को-पायलटने इमर्जन्सी लँडिंग केलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता पुन्हा घडली आहे. 271 प्रवाशांसह मियामीहून चिलीला जाणाऱ्या कमर्शियल फ्लाइटमध्ये कोणीही विचार केला नसेल असं घडलं आहे. 

विमानाच्या पायलटचा उड्डाणाच्या दरम्यान मृत्यू झाला. फ्लाइटचा कमांडर 56 वर्षीय इवान अंदाउर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विमानाच्या वॉशरूममध्ये गेला. येथे अचानक बाथरूममध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. यानंतर इवानला हार्ट अटॅक आल्याची माहिती समोर आली आहे. 

बाथरूममध्ये ही घटना झाल्याचं समजल्यानंतर विमानाच्या को-पायलटने पनामा सिटीच्या टोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केलं. येथे तपासणी केल्यानंतर मेडिकल टीमने इवानचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. विमान उतरत असताना, इसाडोरा नावाची एक नर्स विमानातील दोन डॉक्टरांसह पायलटच्या मदतीला धावली. सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. 

विमान पनामा सिटीमध्ये उतरल्यानंतर पायलटला मृत घोषित करण्यात आले. एका प्रवाशाने सांगितलं की, टेकऑफनंतर सुमारे 40 मिनिटांनी को-पायलटने विमानातील सर्व डॉक्टरांना विनंती केली. अंदाउरची प्रकृती बिघडल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लँडिंगनंतर विमान रिकामं करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी विमान सेवा सुरू होईपर्यंत प्रवाशांना पनामा शहरातील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: pilot dies in flight bathroom with 271 onboard co pilots make emergency landing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.