वैमानिकाने सहायकास कॉकपीटबाहेर काढले
By Admin | Published: July 7, 2014 04:36 AM2014-07-07T04:36:50+5:302014-07-07T04:36:50+5:30
पर्थहून आॅकलंडला चाललेल्या विमानात वैमानिकाने सहवैमानिकाशी झालेल्या बाचाबाचीनंतर त्याला कॉकपीटबाहेर काढल्याची घटना घडली
वेलिंग्टन : पर्थहून आॅकलंडला चाललेल्या विमानात वैमानिकाने सहवैमानिकाशी झालेल्या बाचाबाचीनंतर त्याला कॉकपीटबाहेर काढल्याची घटना घडली.
न्यूझीलंड हवाई सेवेच्या विमानात २१ मे रोजी हे नाट्य घडले. हे विमान निर्धारित वेळेत सुटले नव्हते. सहवैमानिकाची मद्य व ड्रग चाचणी होण्यास वेळ लागला. त्यामुळे विमानाने ठरलेल्या वेळेत उड्डाण केले नाही. त्यामुळे कॅप्टन महाशय चिडले. त्यांना आपल्या सक्षमतेचा भलताच अभिमान होता.
न्यूझीलंडचे सुरक्षा व्यवस्थापक एरोल बर्टेनशॉ यांनी दिलेल्या माहितीनुसार ही फ्लाईट रात्रीची होती. सहवैमानिकाने इतर सहकाऱ्यांबरोबर कॉफीपान केले. त्यानंतर तो कॉकपीटच्या दारात गेला; पण कॅप्टनने त्याला दारच उघडले नाही. सहवैमानिकाला काळजी वाटू लागली. त्याने दुसऱ्या दाराने कॉकपीटमध्ये प्रवेश केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली (वृत्तसंस्था)