कझाकिस्तानमध्ये 100 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले; 9 ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 09:30 AM2019-12-27T09:30:22+5:302019-12-27T10:10:05+5:30
कझाकिस्तानच्या अल्मटी विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले होते.
नवी दिल्ली : बेक एअरलाईन्सचे 100 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान दुमजली इमारतीवर कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये 9 जण जागीच ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
कझाकिस्तानच्या अल्मटी विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले होते. मात्र, त्यानंतर काही क्षणांतच हे विमान नागरी वस्तीवर कोसळले. या विमानामध्ये 95 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर होते.
कझाकिस्तानच्या मंत्रालयाने सांगितेल की विमानाने उंची गमावली आणि सकाळी 7.22 वाजता सिमेंटच्या संरक्षण भिंत आणि दुमजली इमारतीवर कोसळले. हे विमान अल्मटीहून नूरसुल्तानला जात होते. हे विमान तलगार भागात कोसळले असून हा भाग विमानतळाला लागूनच आहे. अपघातानंतर काही वेळातच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.
Plane with 100 people on board crashes in Kazakhstan, emergency services at the site - Almaty airport: Reuters pic.twitter.com/5F2q6jVD22
— ANI (@ANI) December 27, 2019
अपघाताची चौकशी करण्यासाठी सरकारने चौकशी समितीची स्थापना केली आहे.
#Bekair plane crashes after take off from Almaty Airport #flight2100#Almaty#Алматыpic.twitter.com/qx9HiKbjSn
— Hamadi Aram (@H_Aram) December 27, 2019