नेपाळच्या काठमांडूत भीषण अपघात; टेक ऑफ करताना १९ प्रवाशांसह कोसळले विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 11:56 AM2024-07-24T11:56:36+5:302024-07-24T12:11:46+5:30
नेपाळमध्ये त्रिभुवन विमानतळावर एक मोठा विमान अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Nepal Plane Crash :नेपाळमध्ये पुन्हा एका विमान अपघाताची घटना समोर आली आहे. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर टेक ऑफ दरम्यान विमान कोसळले. विमान कोसळात ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे. काठमांडू येथून पोखराला जाणाऱ्या या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण १९ जण होते. या अपघातात नेमकी किती जीवितहानी झाली हे सध्यातरी समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच बचावपथकाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. मित्सुबिशी CRJ-200ER या दुर्दैवी सौर्य एअरलाइन्सच्या फ्लाइट 9N-ME मध्ये हा अपघात झाला.
काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सौर्य एअरलाइन्सचे विमान टेकऑफ दरम्यान कोसळले. विमान कोसळताच त्याने पेट घेतला. हा अपघात सकाळी ११ च्या सुमारास झाला. अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. अपघाताचे कारण आणि जीवितहानी अद्याप समजू शकलेली नाही. अपघातस्थळावरून आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. विमानाचा पायलट कॅप्टन मनीष शाक्य (३७) याला वाचवण्यात आले असून त्यांना सिनामंगल येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे विमान पूर्णपणे जळून खाक झालं आहे.
#WATCH | Plane crashes at the Tribhuvan International Airport in Nepal's Kathmandu. Details awaited pic.twitter.com/tWwPOFE1qI
— ANI (@ANI) July 24, 2024
माध्यमांच्या वृत्तानुसार, विमान टेकऑफच्या वेळी धावपट्टीवरून घसरले आणि अपघात झाला. अपघातानंतर लगेचच विमानाला आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षा कर्मचारी आग विझवण्यासाठी आणि वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.