MH-17 विमानाच्या रहस्यावरून पडदा उठला, रशियन मिसाईलने पाडलं विमान
By admin | Published: September 28, 2016 11:20 PM2016-09-28T23:20:34+5:302016-09-28T23:20:34+5:30
दोन वर्षांपूर्वी 298 जणांना घेऊन जाणारं मलेशियन एअरलाईन्सचं एमएच17 विमान रशियन मिसाईलने पाडण्यात आलं होतं. या विमानाला 9 एम 83 सिरीजच्या बीयूके
Next
ऑनलाइन लोकमत
अॅम्सटरडॅम, दि. 28- दोन वर्षांपूर्वी 298 जणांना घेऊन जाणारं मलेशियन एअरलाईन्सचं एमएच17 विमान रशियन मिसाईलने पाडण्यात आलं होतं. या विमानाला 9 एम 83 सिरीजच्या बीयूके मिसाइलद्वारे पाडण्यात आलं होतं अशी माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्ष साक्षीदारांनी दिलेली माहिती, कॉल रेकॉर्ड्स, छायाचित्र आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आंतरराष्ट्रीय संयुक्त समितीने दिलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. मलेशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलँड, आणि युक्रेन या देशांची संयुक्त तपास समिती नेमण्यात आली होती.
9 एम 83 बीयूके मिसाइल रशियन बनावटीचं असून रशियाच्या सैन्यातील जवानांच्या सहकार्यामुळेच हे विमान पाडण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे. जुलै 2014 मध्ये 298 जणांना घेऊन जाणारं हे विमान युक्रेनमध्ये रहस्यमयरित्या कोसळलं होतं.