सागरी पक्ष्यांच्या पोटातही प्लॅस्टिक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 06:10 AM2018-06-24T06:10:22+5:302018-06-24T06:10:25+5:30
प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाने आता महासागरांनाही व्यापले असून, मानवी वस्तीपासून शेकडो मैल दूर असलेल्या निर्जन बेटांवरील सागरी पक्ष्यांची पोटेही या प्लॅस्टिकने टम्म भरून त्यांचे जीव धोेक्यात आले आहेत.
लंडन : प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाने आता महासागरांनाही व्यापले असून, मानवी वस्तीपासून शेकडो मैल दूर असलेल्या निर्जन बेटांवरील सागरी पक्ष्यांची पोटेही या प्लॅस्टिकने टम्म भरून त्यांचे जीव धोेक्यात आले आहेत.
प्लॅस्टिकमुळे पर्यावरणास असलेला धोका जगापुढे आणण्यासाठी ‘बीबीसी’ने अनेक डॉक्युमेंटरी तयार करण्याची योजना हाती घेतली आहे. याच मालिकेतील ‘ड्राउनिंग इन प्लॅस्टिक’ ही ताजी डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी सागरीजीव वैज्ञानिकांसह आॅस्ट्रेलियापासून ६०० किमी पूर्वेस असलेल्या लॉर्ड होव बेटावर गेलेल्या चमूला हे विदारक वास्तव दिसून आले.
या बेटावर एका ठराविक प्रजातीच्या सागरी पक्ष्यांची मोठी वस्ती आहे. ‘बीबीसी’चा चमू तेथे पोहोेचला तेव्हा बेटाच्या खडकाळ किनाºयाच्या सांदेकपारींमध्ये या पक्ष्यांची लहान पिल्ले हजारोंच्या संख्येने होती. त्यांचे आई-वडील सागरात फेरफटका मारून खाद्य घेऊन येतात व पिल्लांच्या चोचीत भरवितात. पक्ष्यांची ही प्रजाती जे मिळेल ते खाणारी आहे. पिल्लांना काय भरविले जाते याची बाकराईने तापसणी केली असता त्यांची पोटे प्लॅस्टिकच्या कणांनीच टम्म भरली आहेत व त्यात सकस अन्न घालायला व पचवायला जागाच शिल्लक नाही, असे आढळून आले. वन्यजीव वैज्ञानिकांनी या पिल्लांना जीवदान देण्यासाठी त्यांची पोटे रिकामी करण्याचे काम हाती घेतले.
चोचींतून नळी घालून पोटातील पदार्थ शोषून बाहेर काढले, तेव्हा अनेक पिल्लांच्या पोटांमध्ये प्लॅस्टिकचे शेकडो तुकडे भरलेले असल्याचे निष्पन्न झाले. लॉर्ड होव बेटावर पाहिली, तेवढी मन विषण्ण करणारी दुसरी कोणतीही गोष्ट मी पाहिली नव्हती.
-लिझ बॉन्निन, डॉक्युमेंटरीची सादरकर्ती.