कुलभूषण जाधवप्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2017 10:59 PM2017-05-19T22:59:24+5:302017-05-19T22:59:24+5:30
जाधवांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर पाकनं याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात एका याचिका दाखल केली आहे.
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 19 - आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण जाधवांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर पाकनं याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात एका याचिका दाखल केली आहे. कुलभूषण जाधवप्रकरणी सहा आठवड्यांत पुन्हा सुनावणी घ्या, असं याचिकेत पाकनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्याचे आदेश पाकिस्तानला दिले. मात्र आता या प्रकरणी पाकिस्तानने याचिका दाखल केल्याचे वृत्त पाकिस्तानमधील एका वेबसाइटनं दिलं आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधवांच्या फाशीला स्थगिती दिलीय. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाला पाकिस्तान पुन्हा आव्हान देणार असून, पाकिस्तानकडून आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे, असं वृत्त एका वेबसाइटनं दिलं आहे. जाधव प्रकरणात कुरेशी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानची बाजू मांडणार असून, कुलभूषण जाधव त्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात शनिवारपर्यंत अपील करू शकतं, असं त्या वेबसाइटनं म्हटलं आहे. पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टानं 10 एप्रिल रोजी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली. भारतीय गुप्तहेर यंत्रणा रॉसाठी हेरगिरी केल्याचा आरोप पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर ठेवला आहे.