प्लुटोवरील टेकड्यांची यानाने टिपली छायाचित्रे
By admin | Published: February 6, 2016 02:48 AM2016-02-06T02:48:06+5:302016-02-06T02:48:06+5:30
नासाच्या न्यू होरायझन्स अंतराळ यानाने प्लुटो ग्रहावरील गोठलेल्या नायट्रोजन हिम नद्यांची अनेक छायाचित्रे घेतली आहेत.
वॉशिंग्टन : नासाच्या न्यू होरायझन्स अंतराळ यानाने प्लुटो ग्रहावरील गोठलेल्या नायट्रोजन हिम नद्यांची अनेक छायाचित्रे घेतली आहेत. या तरंगत्या टेकड्या कदाचित बर्फरूपी पाण्याचा अंश असाव्यात. या छायाचित्रांमुळे प्लुटोवरील मोहक आणि विपुल संख्येने असलेल्या भूगर्भाच्या हालचालींवर अधिक चांगला प्रकाश पडू शकेल.
या टेकड्यांचा आकार एक किलोमीटरपासून ते कित्येक किलोमीटर पसरलेला आहे, असेही न्यू होरायझन्सने घेतलेली छायाचित्रे आणि गोळा केलेल्या माहितीच्या आधारे म्हणता येते. या टेकड्या फार मोठ्या पृष्ठभागावर पसरल्या असून, त्यांना सध्या अनौपचारिकपणे ‘स्पुटनिक प्लॅनूम’ म्हटले जाते. या टेकड्या म्हणजे स्पुटनिक प्लॅनूमच्या पश्चिम सीमेवरील फार मोठ्या व एकमेकांमध्ये शिरलेल्या पहाडांच्या छोट्या वा सूक्ष्म प्रतिकृती आहेत.