'भारत-पाकिस्तान चांगले शेजारी व्हावेत असं मला वाटतं, पण RSS ची विचारधारा आडवी येते...'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 18:10 IST2021-07-16T15:54:15+5:302021-07-16T18:10:50+5:30
Pakistani PM on indo-pak talk and Taliban:उज्बेकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सेंट्रल साउथ एशिया कॉन्फ्रेंसमध्ये इम्रान खान आले होते.

'भारत-पाकिस्तान चांगले शेजारी व्हावेत असं मला वाटतं, पण RSS ची विचारधारा आडवी येते...'
ताशकंद: भारत आणि पाकिस्तानमधील चर्चेबाबत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी आश्चर्यजनक वक्तव्य केलंय. उज्बेकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सेंट्रल साउथ एशिया कॉन्फ्रेंसमध्ये इम्रान खान आले होते. यावेळी एएनआय या वृत्तसंस्थेने भारताकडून त्यांना प्रश्न विचारला की, दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी होऊ शकते का ?
#WATCH Pakistan PM Imran Khan answers ANI question, 'can talks and terror go hand in hand?'. Later he evades the question on whether Pakistan is controlling the Taliban.
— ANI (@ANI) July 16, 2021
Khan is participating in the Central-South Asia conference, in Tashkent, Uzbekistan pic.twitter.com/TYvDO8qTxk
या प्रश्नाला उत्तर देताना इम्रान खान म्हणाले की, "आम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत आहोत की, भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत. दोन्ही देश सभ्य शेजाऱ्यासारखे राहावेत. पण, करणार काय ? RSS ची विचारधारा आडवी येते...' यानंतर त्यांना तालिबानवर तुमचा कंट्रोल नाही का ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर इम्रान यांनी उत्तर देणं टाळलं.
काश्मीरमध्ये पूर्वीप्रमाणे परिस्थिती व्हावी...
यापूर्वी जुन महिन्यात इम्रान यांनी भारत-पाकिस्तान चर्चेवर भाष्य केले होते. भारताने काश्मीरमध्ये पूर्वीप्रमाणे परिस्थिती आणवी. कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला सरकारने मागे घ्यावे, यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये चर्चे होऊ शकते, असे ते म्हणाले होते. तर, 24 जून रोजी मोदींनी काश्मीरी नेत्यांसोबत बैठक घेतली होती. त्या बैठकीतही काश्मीरी नेत्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता.