PM Modi Jacket: G-7 समिटमध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या जॅकेटची चर्चा; जगाला दिला महत्वाचा संदेश...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 05:53 PM2023-05-21T17:53:32+5:302023-05-21T17:54:38+5:30
PM Modi In Hiroshima: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या विशेष निमंत्रणावरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी हिरोशिमाला पोहोचले.
PM Modi Attire In G7 Summit: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या विशेष निमंत्रणावरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी हिरोशिमाला पोहोचले. यादरम्यान पीएम मोदींच्या अनेक फोटो आणि व्हिडिओंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यात पंतप्रधान मोदींचे जॅकेट सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात त्यांनी G-7 च्या व्यासपीठावरुन जगाला एक खास संदेशही दिला आहे.
पीएम नरेंद्र मोदींनी शिखर G-7 परिषदेत रिसायकल मटेरियलपासून बनवलेले जॅकेट घातले होते. जॅकेट तयार करण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. पीएमचे जॅकेट बनवण्यासाठी वापरलेल्या बाटल्या एकत्र करुन वितळवण्यात आल्या आणि त्यात रंग मिसळून सूत तयार केले गेले. अशा प्रकारे जुन्या प्लास्टिकचा वापर करून जॅकेट तयार करण्यात आले.
पंतप्रधान मोदींचा जगाला संदेश
याआधी 8 फेब्रुवारी 2023 रोजी पीएम मोदींनी अशाच प्रकारचे फिकट निळ्या रंगाचे जॅकेट घालून लोकसभेत पोहोचले होते. प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून ते जॅकेट तयार करण्यात आले होते. हिरोशिमा येथे झालेल्या G-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी अनेक संकटांवर मात करण्यासाठी एकत्र काम करण्यावर भर दिला. परिषदेच्या विशेष सत्रात त्यांनी जगाला नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्याचा संदेश दिला.
नैसर्गिक शेतीवरही भर
पीएम मोदी म्हणाले, माझा विश्वास आहे की, विकास मॉडेलने विकासाचा मार्ग दाखवला पाहिजे. विकसनशील देशांच्या प्रगतीत हा अडथळा बनू नये. त्याचबरोबर खतांना पर्याय म्हणून नैसर्गिक शेतीचे नवे मॉडेल जगभरात निर्माण करण्याचा त्यांनी आग्रह धरला. तसेच, डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ जगातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.