पंतप्रधान मोदी लाओसमध्ये
By admin | Published: September 8, 2016 05:17 AM2016-09-08T05:17:59+5:302016-09-08T05:17:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अशियन-भारत आणि पूर्व अशिया शिखर परिषदेसाठी बुधवारी येथे आगमन झाले. दक्षिणपूर्व अशियातील या देशांशी भारताचे व्यापारी आणि सुरक्षेचे करार या दौऱ्यात अधिक बळकट केले जातील.
लाओस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अशियन-भारत आणि पूर्व अशिया शिखर परिषदेसाठी बुधवारी येथे आगमन झाले. दक्षिणपूर्व अशियातील या देशांशी भारताचे व्यापारी आणि सुरक्षेचे करार या दौऱ्यात अधिक बळकट केले जातील.
या भेटीत मोदी परिषदेशिवाय अनेक द्विपक्षीय बैठकांमध्ये सहभागी होतील. त्यांची सुरवात बुधवारी जपानचे पंतप्रधान शिन्झो अबे यांच्या भेटीने होईल. मोदी यांची लाओशियन पंतप्रधान थोंगलोऊन सिसौलिथ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होईल. या चर्चेत दहशतवाद, सागरी सुरक्षा, विभागीय सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी आणि अशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य आदींवर चर्चा होईल. २१ सदस्यांच्या खास अशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य गटात समावेश करून घेण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
पूर्वेकडील देशांकडे लक्ष देण्याच्या आमच्या धोरणासाठी अशियन हा महत्वाचा भागीदार आहे व तो आमच्या उत्तरपूर्वेकडील विभागांच्या विकासासाठी महत्वाचा आहे, असे मोदी यांनी या परिषदेच्या तोंडावर प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले.