PM मोदी 'जगात भारी'; लोकप्रियतेच्या यादीत मिळवला पहिला नंबर! बायडन, ऋषी सुनक कितवे?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 08:23 PM2024-02-22T20:23:09+5:302024-02-22T20:24:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत असा अनेक भारतीयांना विश्वास आहे. याला आता एका सर्व्हेची जोड मिळाली आहे. त्यांना तब्बल ७८ टक्के मते मिळाल्याचे उघड झाले आहे.
PM Modi most popular global leader: पंतप्रधाननरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत असा अनेक भारतीयांना विश्वास आहे. याला आता एका सर्व्हेची जोड मिळाली आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान मोदींनी जगातील अनेक बड्या आणि शक्तिशाली देशांच्या प्रमुखांना मागे टाकले आहे. मॉर्निंग कन्सल्ट सर्व्हे (Morning Consult survey) एजन्सीने केलेल्या जागतिक सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि जर्मन चान्सलर ओलाफ सोझ यांच्यापेक्षाही पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मॉर्निंग कन्सल्टच्या जागतिक सर्वेक्षणाच्या क्रमवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक ७७ टक्के मते मिळाली आहेत, तर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर ६४ टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. स्वित्झर्लंडचे नेते अलेन बेरसेट यांना ५७ टक्के मते मिळाली आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रँकिंगमध्ये अमेरिका आणि इंग्लंडचे दोन्ही प्रसिद्ध नेते, जो बायडेन आणि ऋषी सुनक त्यांच्यापेक्षा खूप मागे आहेत.
रँकिंगमध्ये बायडेन, सुनक कुठे आहेत?
हे सर्वेक्षण नुकतेच मॉर्निंग कन्सल्टने ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान केले होते. पंतप्रधान मोदी हे जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यांची लोकप्रियता कायम आहे. सर्वेक्षणातील आकडेवारी या बाबतीत सर्वात महत्त्वाची आहे की, रँकिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना ३७ टक्के, ऋषी सुनक यांना २७ टक्के मते मिळाली आहेत. पंतप्रधान मोदी हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकप्रिय चेहरा असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
How jeaulous are Western leaders?
— Erik Solheim (@ErikSolheim) February 22, 2024
With an Incredible 77% approval rate for prime minister Modi, may be it is time for Western media to give India an Modiji some positive coverage? pic.twitter.com/GG9FrHotgs
मॉर्निंग कन्सल्टबद्दल...
मॉर्निंग कन्सल्ट ही एक बिझनेस इंटेलिजन्स कंपनी आहे. मॉर्निंग कन्सल्ट नावाची ही संस्था वेळोवेळी जगातील प्रमुख देशांतील प्रमुख नेत्यांच्या लोकप्रियतेचा आलेख मांडते. मॉर्निंग कन्सल्ट ही एक जागतिक दर्जाची कंपनी आहे, जी त्या-त्या काळातील सर्वात हुशार, वेगवान आणि सर्वोत्तम निर्णय घेणारे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागतिक नेत्यांबद्दल जनमताचा डेटा गोळा करते. मॉर्निंग कन्सल्ट सर्व्हे एजन्सी तिच्या गुणवत्तेसाठी ओळखली जाते. कंपनीने सादर केलेले सर्वेक्षण अगदी अचूक मानले जाते.